शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगळुरूला धक्का, अहमदाबादमध्ये खेळवली जाणार IPL 2026 ची फायनल, प्लेऑफचं वेळापत्रक जाहीर
2
पाकिस्तानकडून आता दारू विकायला सुरुवात! ५० वर्षांपूर्वी 'हराम' म्हणून केलेली बॅन, पैसा कमवायच्या नादात...
3
सम्राट चौधरींचा मंत्रिमंडळ विस्तार 'पावसात वाहून गेला'; गांधी मैदानात चिखलाचे साम्राज्य
4
West Bengal Violence: हिंसेचा भडका! भाजपा आमदाराच्या भावाची हत्या, हिंसाचारात आतापर्यंत चौघांचा मृत्यू; जवानांवरही गोळीबार
5
"नुसतं नावाला 'घरचं मैदान', पिच बनवताना आम्हाला विचारत नाहीत.."; DC च्या कोचचा राग अनावर
6
इराकची जगाला मोठी 'ऑफर'! ११००० रुपयांचा कच्च्या तेलाचा बॅरल ३१०० रुपयांत देणार; अट फक्त एकच...
7
Top Marathi News LIVE: प. बंगालमध्ये निकालानंतर हिंसाचार थांबेना, जमावाने लेनिनचा पुतळा तोडला...
8
नशीब असावं तर थलापती विजयसारखं...! आधी TVK चा मोठा विजय अन् आता समोरून आली Good News
9
तामिळनाडूच्या राजकारणात मोठा ट्विस्ट; AIADMK चा TVK ला बाहेरून पाठिंबा देण्याचा निर्णय!
10
Punjab Blast: पंजाब हादरलं! ३ तासांत २ मोठे धमाके; अमृतसर आणि जालंधरमध्ये नेमकं काय घडलं? वाचा संपूर्ण टाइमलाईन
11
एका फुग्यावरून वाद अन् तरुणाचा बळी! उत्तम नगर मर्डर केसमध्ये धक्कादायक खुलासे
12
लोन फेडलं नाही तर बँक जप्त करू शकते तुमची प्रॉपर्टी; RBI नं जारी केले नवे ड्राफ्ट नियम
13
पश्चिम बंगालचा निकाल येताच अखिलेश यादव यांचा मोठा निर्णय; समाजवादी पार्टीने IPAC सोबतची डील केली रद्द
14
DC vs CSK : वाऱ्यानं बेल्स पडल्या, मग Nitish Rana आउट कसा? डेड बॉल का नाही? नियम काय सांगतो?
15
दिवाळखोर होण्याचं संकट टळलं! कंपनीला क्लिन चीट, शेअरला २०%चं अपर सर्किट; ३० दिवसांत ३३% ची वाढ
16
Numerology: अंकशास्त्रानुसार 'या' ४ मुलांकांच्या स्त्रिया साक्षात लक्ष्मीचं रूप; घरात आणतात अपार सुख-समृद्धी
17
विजय यांच्या टीव्हीकेला पाठिंबा द्या, अन्यथा..., ३० आमदारांचा इशारा, तामिळनाडूत अण्णा द्रमुक फुटीच्या उंबरठ्यावर?
18
मुंबई विमानतळावर ७ मे रोजी ६ तासांचा 'ब्लॉक'; धावपट्टीच्या देखभालीसाठी विमान सेवा राहणार बंद
19
Sanju Samson: संजू सॅमसन सुसाट! डेव्हिड वॉर्नरचा रेकॉर्ड मोडला, एबी डिव्हिलियर्सचा विक्रम धोक्यात
20
अजबच! एकाच आईच्या जुळ्या मुली, पण दोघींचेही वडील वेगवेगळे; DNA रिपोर्टमधून खळबळजनक खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

‘म्हैसाळ’च्या पाण्याने द्राक्षबागा वाचल्या

By admin | Updated: April 27, 2015 00:15 IST

आंतरमशागतीच्या कामांनाही वेग : मिरज पूर्वमध्ये खरड छाटण्या अंतिम टप्प्यात

प्रवीण जगताप -लिंगनूर  मिरज पूर्वभागात द्राक्षपट्टा मोठ्या प्रमाणावर तयार झाला आहे. अवकाळी पाऊस व रोगांपुढे गुडघे न टेकता येथील द्राक्षोत्पादक वाटचाल करीत आहेत. द्राक्षे काढणीनंतर काहीशी विश्रांती घेत आता मार्चच्या पहिल्या आठवड्यापासून एप्रिलअखेर ९० टक्के द्राक्षबागांच्या खरडछाटण्या पूर्णत्वास आल्या आहेत. उन्हाळ्यात अवकाळी पाऊस द्राक्षबागांसाठी उपयुक्त असला तरी, अवकाळी गारपीट मात्र द्राक्षांच्या काड्यांकरिता धोकादायक ठरत आहे.मिरज पूर्वभागात प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही डिसेंबरपासून द्राक्ष काढणीचा हंगाम सुरू झाला. सर्व टप्प्यात द्राक्षाची फळ छाटणी घेणारे द्राक्षोत्पादक या भागात असल्याने डिसेंबर ते मार्चपर्यंत येथील द्राक्ष काढणीचा हंगाम सुरू असतो. काही द्राक्षबागा बेदाणा निर्मितीच्या असल्याने या द्राक्षबागांची काढणी फेब्रुवारी व मार्चमध्ये सुरू असते. ज्या द्राक्षबागांची फळछाटणी आगाप असते, त्या द्राक्षोत्पादकांना मात्र जवळपास अडीच ते तीन महिने द्राक्ष काढणीनंतर कामांतून विश्रांती मिळते. मात्र बेदाण्याच्या द्राक्षोत्पादकांना वीस दिवसांच्या विश्रांतीनंतर लगेचच खरड छाटणीच्या कामाला लागावे लागले आहे.खरड छाटणीनंतर आता द्राक्षबागांतून पालवी फुटावयास प्रारंभ झाला आहे. कालावधीनुसार पालवी फुटण्याचे प्रमाण कमी-जास्त दिसून येत आहे. त्याचबरोबर आता सबकीन शेंडा मारणे व विरळणी या कामासही काही ठिकाणी वेग आलेला दिसून येत आहे. खरड छाटणी द्राक्षबागांच्या गर्भधारणेत महत्त्वाच्या ठरणाऱ्या काडीला पक्व बनविण्यातील महत्त्वाचा टप्पा आहे. काडी चांगली पक्व बनल्यास काडीला तीन ते चार घड पडू शकतात. त्यामुळे काळजीपूर्वक खरड छाटणी व अन्य आंतरमशागतीच्या कामास वेग आला आहे. पाऊस चालेल, पण गारा नकोतउन्हाळ्यात अवकाळी पाऊस द्राक्षबागांसाठी उपयुक्त असला तरी, अवकाळी गारपीट मात्र द्राक्षांच्या काड्यांकरिता धोकादायक ठरत आहे. खरड छाटणीनंतर पालवी फुटताना द्राक्षबागांना मुबलक पाणी लागते. मात्र नेमके याच महिन्यात पाण्याची टंचाई तयार होते. पण आता भागात ‘म्हैसाळ’चे पाणी कालव्यांतून फिरू लागले आहे. या पालवी फुटण्याच्या मोसमात अवकाळी पाऊस पडला, तर तो द्राक्षबागांना उपयुक्तच आहे. मात्र याच अवकाळी पावसाचे गारांत रूपांतर झाल्यास काडी फुटणे, काडीला मार बसणे, पाने फाटणे यामुळे काडी पक्व होण्यात व त्यांना घड पडण्यात अडथळे येतात. जास्त गारपिटीमुळे पुन्हा तळातून काडी कट करून नव्याने काडी तयार करण्याचा त्रास व खर्च पेलावा लागतो.