शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! भारतात दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला; गुजरातमधून ३ संशयित दहशतवाद्यांना अटक
2
भारतात राहणारे सर्वच हिंदू; मुस्लीम आणि ख्रिश्चन आपल्याच पूर्वजांचे वंशज, काय म्हणाले सरसंघचालक मोहन भागवत
3
एकनाथ शिंदे अन् उद्धव ठाकरेंना भाजपाचा मोठा धक्का; २ मोठ्या नेत्यांचा लवकरच पक्षप्रवेश होणार
4
सोनं की रिअल इस्टेट? गुंतवणुकीसाठी कोणता पर्याय ठरेल जास्त फायदेशीर? तज्ज्ञांनी दिला महत्त्वाचा सल्ला
5
जेल की रिसॉर्ट? ISIS रिक्रूटर आणि सीरियल किलरकडे मोबाईल; अधिकाऱ्यांच्या मदतीने कैद्यांची मजा
6
बांगलादेशात रस्त्यांना छावणीचं स्वरूप, मोहम्मद युनूस यांच्या घराबाहेर मोठा फौज फाटा; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
7
प्रदूषणकारी रसायनांचे उत्पादन करणारा कारखाना रत्नागिरीच्या लोटे वसाहतीत
8
हत्येनंतर शीर अन् धड वेगळे केले, सुटकेसमध्ये मृतदेह लपवून फरार; अखेर १६ वर्षांनी आरोपीला अटक
9
महाराष्ट्राच्या १५ हजार एकर महसूल जमिनीसह सीमेवरील १४ गावांवर तेलंगण राज्याचा ताबा !
10
भारताकडे 'रेअर अर्थ'चा ५वा सर्वात मोठा खजिना; तरीही आयातीसाठी चीनवर का अवलंबून? 'ही' आहे खरी अडचण
11
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
12
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
13
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
14
"मला पुढच्या जन्मी गोविंदा पती म्हणून नकोय...", सुनीता अहुजाचं वक्तव्य चर्चेत, म्हणाली- "हा एकच जन्म..."
15
लोक प्रवाशांच्या जीवावर कोण उठले? सँडहर्स्ट रोड अपघाताची चौकशी जीआरपीकडे
16
ट्रॉलरसह आठ मच्छीमारांचे पाकिस्तानकडून अपहरण?
17
विकृत इसमाने मांजरावर केला अतिप्रसंग; मुंबईतील धक्कादायक घटना
18
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
19
केवळ पत्नी रडायची, म्हणून पतीला क्रूरतेसाठी दोषी ठरवू शकत नाही: उच्च न्यायालय
20
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!

रत्नागिरी-नागपूर महामार्गावरून प्रवास महागला, उद्यापासून पथकरात वाढ..जाणून घ्या नवे दर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2023 11:42 IST

सांगली जिल्ह्याच्या पुढे अनकढाळ आणि इचगाव या नाक्यांवरही पथकरवाढ

सांगली : रत्नागिरी-नागपूर महामार्गाच्या पथकरामध्ये शनिवारपासून (दि. १) वाढ होणार आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने तसे प्रकटन प्रसिद्ध केले आहे. अवघ्या सात महिन्यांतच या मार्गावर पथकरवाढीला सामोरे जावे लागणार आहे.१६ ऑगस्ट २०२२ रोजी पथकर (टोल) वसुली सुरू झाली होती. त्याला वर्ष पूर्ण होण्यापूर्वीच वाढ जाहीर झाली आहे. अर्थात, राज्यभरातील महामार्गावर १ एप्रिलपासून पथकरवाढ होणार असल्याने रत्नागिरी-नागपूर महामार्गालाही लागू झाली आहे. सांगली जिल्ह्यात बोरगाव (ता. कवठेमहांकाळ) येथे टोलनाका आहे. तेथे किमान १० ते कमाल १ हजार ५९५ रुपये अशी दरवाढ आहे. ती शनिवारी (दि. १) सकाळी आठपासून अंमलात येईल. मासिक पासचे शुल्कही वाढवले आहे. परिसरातील गावांतील बिगरव्यावसायिक वाहनांचा वार्षिक पास ३१५ रुपयांवरून ३३० रुपये केला आहे.मोटार, जीप व हलक्या वाहनांना दुहेरी प्रवासासाठी १०० ऐवजी आता ११० मोजावे लागतील. लहान मालवाहू टेम्पो, मिनीबस यांना १६५ वरून १८० रुपये दुहेरी पथकर असेल. दोन ॲक्सलच्या ट्रक व बसचा पथकर ३४० वरून २८० झाला आहे. तीन ॲक्सलच्या व्यावसायिक वाहनांसाठी ३७० ऐवजी ४१५ पथकर असेल. चार ते सहा ॲक्सलच्या अवजड वाहनांसाठी ५३५ वरुन ५९५ रुपये द्यावे लागणार आहेत. सातपेक्षा जास्त ॲक्सलच्या अवजड वाहनांसाठी ६५० ऐवजी ७२५ रुपये द्यावे लागणार आहेत.

पथकर वाढ अशी (एकेरी प्रवासासाठी)वाहन -  जुना पथकर  - नवा पथकर  -  जुना मासिक पास   -  नवा मासिक पासजीप, मोटार, व्हॅन   - ६५   - ७५   - २२४०  - २४८५मिनी बस   - ११०  - १२० -  ३६१५ -  ४०१५ट्रक, बस   - २२५  -  २५०  - ७५७५   - ८४१०व्यावसायिक वाहने  - २५०  - २७५  - ८२६५ - ९१७५अवजड वाहने - ३५५  -  ३९५  - ११८८०  - १३१९०सातपेक्षा जास्त ॲक्सलची अवजड वाहने -  ४३५  -  ४८०  - १४४६५   - १६०६०

तीनही पथकर नाक्यांवर दरवाढसांगली जिल्ह्याच्या पुढे अनकढाळ आणि इचगाव या नाक्यांवरही पथकरवाढ झाली आहे. त्यामुळे मिरज ते सोलापूर या अंतरात तीन ठिकाणी जादा पथकर द्यावा लागेल. छोट्या वाहनांना किमान ३० रुपये आणि अवजड वाहनांना १३५ रुपये अतिरिक्त मोजावे लागतील.

टॅग्स :Sangliसांगलीhighwayमहामार्गtollplazaटोलनाकाRatnagiriरत्नागिरीnagpurनागपूर