शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
2
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
3
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
4
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
5
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
6
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
7
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
8
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
9
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
10
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
11
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
12
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
13
सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
14
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
15
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
16
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
17
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
18
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
19
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
20
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
Daily Top 2Weekly Top 5

येळावीत बालिकेवर बलात्कार

By admin | Updated: July 27, 2014 00:32 IST

पलुसच्या संशयितास अटक : ग्रामस्थांकडून बेदम चोप, वाहनाची मोडतोड

तासगाव : येळावी (ता. तासगाव) येथे नऊ वर्षीय बालिकेवर जिवे मारण्याची धमकी देऊन नराधमाने बलात्कार केल्याची घटना घडली. सुरेश रामचंद्र पवार (वय ४४, रा. पवार मळा, पलूस) असे संशयित नराधमाचे नाव आहे. त्यास ग्रामस्थांनी बेदम मारहाण केली. त्याच्या मोटारीची मोडतोड करण्यात आली. आज, शनिवारी दुपारी १२ वाजण्याच्या दरम्यान हा प्रकार घडला. या घटनेने येळावी परिसरात खळबळ उडाली आहे. सुरेश पवार त्याच्या मोटारीतून (एमएच १०, एजी ९३१) दररोज विद्यार्थी वाहतुकीचे काम करतो. यातील पीडित मुलगी पलूस येथील असून, ती भिलवडी येथे एका शाळेत तिसरीमध्ये शिकत आहे. दररोज दुपारची शाळा असते. आज असल्याने सकाळची शाळा होती. सुरेश पवारने नेहमीप्रमाणे सकाळी ७ वाजण्याच्या दरम्यान संबंधित मुलीस मोटारीतून शाळेत सोडले. शाळा सुटल्यानंतर त्याने सर्व मुलांना त्यांच्या घरी सोडले.पीडित मुलीला मात्र तुझ्या आईने येळावीच्या घरी सोडायला सांगितले आहे, असे सांगून पलूसला नेले नाही. नेहमीच्या रस्त्याने गाडी न नेता वेगळ्याच रस्त्याने तो घेऊन गेला. येळावीतील एका शेताजवळ गाडी थांबवून त्याने बलात्कार केला. तेव्हा संबंधित मुलीने आरडाओरडा करण्यास सुरुवात केली. जवळून जाणाऱ्या एकाच्या लक्षात ही बाब आल्यानंतर त्याने लगेचच मुलीच्या वडिलांना दूरध्वनीवरून बोलावून घेतले. तेव्हा गावातील काही लोक तिथे जमा झाले होते. त्यांनी सुरेश पवारला बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली व गाडीही फोडली. पीडित मुलगी रडत होती. पवारने जिवंत सोडणार नाही, मारून टाकीन, अशी धमकी दिल्याचे मुलीने घरच्यांना सांगितले. यापूर्वीही त्याने असा प्रकार दोन-तीनवेळा केल्याचे पीडित मूलीच्या आईने पोलिसांत दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.दरम्यान, या प्रकाराने येळावी परिसरात खळबळ उडाली आहे. रात्री उशिरा बाललैंगिक अत्याचार अधिनियम २०१२ चे कलम ५ सह ६ नुसार गुन्हा नोंद करण्यात आला. पोलीस निरीक्षक रमेश बनकर, सहायक निरीक्षक एस. एस. गुजले यांनी घटनास्थळी भेट दिली. जखमी पवारला सांगलीच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. (वार्ताहर)