शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
4
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
5
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
6
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
7
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
8
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
9
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
10
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
11
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
12
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
13
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
14
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
15
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
16
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
17
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
18
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
19
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
20
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
Daily Top 2Weekly Top 5

रस्ते कामात पावणेदोन लाखाचा गैरव्यवहार

By admin | Updated: January 3, 2015 00:12 IST

दिघंचीतील प्रकार : माजी सरपंचासह चौघांवर गुन्हा

आटपाडी : ‘जाऊ तिथं खाऊ’ या चित्रपटातील विहीर चोरीला गेल्याचा दुसरा प्रकार दिघंची (ता. आटपाडी) येथे घडला आहे. फरक इतकाच की, इथे विहिरीऐवजी चक्क डांबरी रस्ता ‘चोरीला’ गेला आहे. रस्ता न करताच रस्त्याचे काम पूर्ण केल्याचे कागदोपत्री दाखवून दिघंचीचे तत्कालीन सरपंच हणमंतराव देशमुख, ग्रामविकास अधिकारी सुनील कोरे (रा. कळंबी, ता. मिरज), पं. स.चे उपशाखा अभियंता (बांधकाम) यांनी एक लाख ७३ हजार ५0९ रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी आज, शुक्रवारी आटपाडी पोलिसात गुन्हा दाखल केला आहे.आटपाडी पंचायत समितीचे विस्तार अधिकारी कृष्णदेव पाटील यांनी फिर्याद दिली आहे. यामध्ये दलित वस्ती सुधार योजना २0११ चे अंतर्गत ३१ मार्च २0११ रोजी दिघंचीतील बौध्द वस्तीत राहणाऱ्या धर्मराज रणदिवे यांचे घर ते कैलास रणदिवे यांच्या घरापर्यंत करावयाचा डांबरी रस्ता व गटारीचे काम मंजूर केले होते. १ मार्च २0११ ते १७ जून २0११ या कालावधित तत्कालीन सरपंच देशमुख, ग्रामविकास अधिकारी कोरे, आटपाडी पंचायत समितीचे उपअभियंता किंवा शाखा अभियंता यांनी संगनमत करुन खोटी कागदपत्रे तयार केली. अभियंत्यांनी तांत्रिक बिलांची छाननी करुन रस्ता आणि गटारीचे काम पूर्ण केल्याचे माप पुस्तकात नोंद केले आणि या कामाचे मूल्यांकन १ लाख ७३ हजार ५0९ केले. वास्तविक या ठिकाणी गेल्या १0 ते १५ वर्षात त्या रस्त्यावर कोणतेही काम झाले नाही. त्यामुळे देशमुख, कोरे आणि अभियंत्यावर भा. दं. वि. संहिता कायदा ४0८, ४२0, ४६४, ४६८, ४७१ आणि ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक अजित पाटील करीत आहेत. (वार्ताहर)कारवाईस स्थगितीअपहारप्रकरणी दोषी धरलेले माजी सरपंच हणमंतराव देशमुख आणि ग्रामसेवक यांच्यावरील फौजदारी कारवाईस जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी तात्पुरती स्थगिती दिली आहे.