'सदाभाऊंनी कष्टाने बांधलेल्या दोन कोटींच्या बंगल्याला सुरुंग लावू'

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2022 19:22 IST2022-04-20T19:22:12+5:302022-04-20T19:22:46+5:30

कुरळप : सदाभाऊ यांनी माझ्या वाड्याला सुरुंग लावण्याची भाषा केली; पण आम्ही काय बांगड्या भरलेल्या नाहीत, तुम्ही घाम गाळून ...

Rajarambapu factory president P. R. Patil criticism of Sadabhau Khot | 'सदाभाऊंनी कष्टाने बांधलेल्या दोन कोटींच्या बंगल्याला सुरुंग लावू'

'सदाभाऊंनी कष्टाने बांधलेल्या दोन कोटींच्या बंगल्याला सुरुंग लावू'

कुरळप : सदाभाऊ यांनी माझ्या वाड्याला सुरुंग लावण्याची भाषा केली; पण आम्ही काय बांगड्या भरलेल्या नाहीत, तुम्ही घाम गाळून बांधलेल्या दोन कोटींच्या बंगल्याला आम्ही सुरुंग लावू, असा घणाघाती पलटवार राजारामबापू कारखान्याचे अध्यक्ष पी. आर. पाटील यांनी केला.

कुरळप येथे सहायक पोलीस निरीक्षक आणि पोलीस यांच्यावर दगडफेक विरोधात आणि त्यानंतर केलेल्या कारवाईच्या समर्थनार्थ काढलेल्या न्याय मोर्चात ते बोलत होते. पाटील म्हणाले, पोलिसांवर दगडफेक झाली तेव्हा मी माझ्या घरी वाड्यात तर सदाभाऊ खोत हे इस्लामपुरातील त्यांनी कष्टांनी बांधलेल्या दोन कोटींच्या घरात बसले होते. तरी सुद्धा त्यांना तिथून दिसले की, हा दगड मीच मारला आहे. यावरून असे दिसते की, सदाभाऊंना महाभारतातील संजय असल्याचा साक्षात्कार झाला आहे.

कुरळपमध्ये गेली ५० वर्षे जनतेचे काम करतोय, म्हणून जनता माझ्या बाजूने आहे. त्यासाठी काम करावे लागते. दम असेल तर, माझ्यावर समोर येऊन आरोप करा. ज्या नागनाथ अण्णांनी भाजप अस्पृश्य पक्ष म्हणून संबोधले होते, त्यांचेच नातू भाजपच्या मांडीला मांडी लावून बोलत आहेत, हे पाहून अण्णांच्या आत्म्याला काय वाटले असेल, अशी खरमरीत टीका त्यांनी यावेळी केली.

Web Title: Rajarambapu factory president P. R. Patil criticism of Sadabhau Khot