शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वे व्यवस्थापकांसमोर मागण्यांचा पाऊस

By admin | Updated: August 21, 2014 00:25 IST

रेल्वे व्यवस्थापक जॉन थॉमस आज मिरजेत आले

मिरज : सोलापूर विभागीय रेल्वे व्यवस्थापक जॉन थॉमस यांनी मिरज-पंढरपूर मार्गाचा परीक्षण दौरा केला. यावेळी प्रवासी सेना व संघाच्या कार्यकर्त्यांनी विविध समस्या त्यांच्यासमोर मांडून त्यांना मागण्यांचे निवेदन दिले. रेल्वे व्यवस्थापक जॉन थॉमस आज मिरजेत आले होते. यावेळी प्रवासी सेना व संघटनेच्या प्रतिनिधींनी थॉमस यांची भेट घेऊन त्यांना मागण्यांचे निवेदन दिले. पंढरपूर सुपर फास्ट गाडीचा तिकीट दर पॅसेंजरप्रमाणे करावा, मिरज-हैदराबाद एक्स्प्रेस पंढरपूर-सोलापूर मार्गे सुरू करावी, मिरज-पंढरपूर सोलापूर मार्गे मिरज-शहाबाद-वाडी पॅसेंजर सुरू करावी, सलगरे व कवठेमहांकाळ या रेल्वेस्थानकांवर एक्स्प्रेस थांबवाव्यात, कोल्हापूर-सोलापूर एक्स्प्रेस गाडी सकाळी सोडण्यात यावी, पंढरपूर-मिरज-हुबळी मार्गावर धावणाऱ्या पॅसेंजर गाड्यांची स्वच्छता व पाणी भरण्याची व्यवस्था पंढरपूर स्थानकावर करावी, मिरज-पंढरपूर मार्गावरील आरग, सलगरे, बेळंकी, ढालगाव, कवठेमहांकाळ व जतरोड ही सांगली जिल्ह्यातील रेल्वे स्थानके मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागाकडून पुणे विभागाकडे हस्तांतरित करावीत, आदी मागण्यांचे निवेदन व्यवस्थापक थॉमस यांना देण्यात आले. कोल्हापूर-सोलापूर एक्स्प्रेस पुढील महिन्यापासून सकाळी सुरू करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे थॉमस यांनी सांगितले. स्थानक अधीक्षक एम. एस. मसूद, रेल्वे प्रवासी संघाचे अध्यक्ष ए. ए. काझी, प्रवासी सेनेचे किशोर भोरावत, संदीप शिंदे, चंद्रकांत मैगुरे, महेश म्हेत्रे, ज्ञानेश्वर पोतदार, पप्पू शिंदे, अनिल रसाळ, मधुकर साळुंखे, आप्पा नाईक उपस्थित होते. (वार्ताहर)