शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

प्लॅटफॉर्मवर दारू पिताना हटकले, कोरेगावात रेल्वे पोलिसावर हल्ला; तिघांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2024 14:06 IST

कोरेगाव/मिरज : कोरेगाव (जि. सातारा) येथे रेल्वे स्थानकात प्लॅटफॉर्मवर दारू पिताना हटकल्याने पोलिस कर्मचाऱ्यावर तिघांनी दगडाने हल्ला केला. हल्ल्यात ...

कोरेगाव/मिरज : कोरेगाव (जि. सातारा) येथे रेल्वे स्थानकात प्लॅटफॉर्मवर दारू पिताना हटकल्याने पोलिस कर्मचाऱ्यावर तिघांनी दगडाने हल्ला केला. हल्ल्यात पाेलिस कर्मचारी गंभीर जखमी झाला. याप्रकरणी मिरज रेल्वेपोलिसांनी बिअरच्या बाटलीवरून शोध घेत तिघाही मद्यपींना चोवीस तासात जेरबंद केले.कोरेगाव रेल्वे स्थानक शहरापासून लांब निर्जनस्थळी असल्याने रात्रीच्या वेळी पोलिस बंदोबस्त असताे. गुरुवार दि. ६ जून रोजी रात्री ९ वाजता रेल्वे स्थानकावर कर्तव्यास असलेले रेल्वे पोलिस शिपाई राजेंद्र श्रीरंग शिंदे यांना प्लॅटफॉर्मवर तीन अनोळखी व्यक्ती मद्यप्राशन करीत बसल्याचे दिसले. त्यांनी हटकले असता तिघांनी राजेंद्र शिंदे यांच्यावर हल्ला केला. दगडाने डोक्यात व पायावर मारून जबर जखमी केले. अतिरक्तस्त्राव होत असल्याने त्यांनी स्थानक अधीक्षक कार्यालयात प्रथमोपचार घेतले. याबाबत माहिती मिळताच सातारा रेल्वे पोलिस दुरक्षेत्राचे हवालदार आदिनाथ भोसले, नितीन थोरात व दीपक घाडगे यांनी कोरेगावात येऊन शिंदे यांना सातारा येथे खासगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचारासाठी दाखल केले. याबाबत मिरज रेल्वे पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. कर्तव्यावरील पोलिस कर्मचाऱ्यावर हल्ला झाल्याची माहिती मिळताच पुणे रेल्वे पोलिस अधीक्षक तुषार दोशी व उपविभागीय पोलिस अधिकारी संगीता हत्ती यांनी घटनास्थळी भेट दिली. रेल्वे पोलिसांनी तपास पथके तयार करून हल्लेखाेरांच्या शोधासाठी रवाना केली. तपास पथकाने घटनास्थळी मिळालेल्या बिअरच्या बाटलीवरील बॅचनंबर वरून कोरेगाव शहरात स्थानिक पोलिसांच्या मदतीने वाईन शॉपची माहिती घेतली. तेथील सीसीटीव्हीची तपासणी करून त्याआधारे कोरेगाव पोलिसांच्या मदतीने हल्लेखाेर सोमनाथ दत्तात्रय घाडगे (वय २९), रोहित साहेबराव तुपे (२१, दोघे रा. दत्तनगर, कोरेगाव), अक्षय महेंद्र लोहार (२४, रा. कुमठे, ता. कोरेगांव) यांना चोवीस तासात अटक केली. हल्लेखाेरांनी गुन्हा कबूल केला असून तिघांनाही आज-शनिवारी न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

टॅग्स :Sangliसांगलीrailwayरेल्वेPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी