कोल्हापूर-अहमदाबाद एक्स्प्रेससाठी सांगलीला ३३५ तिकिटांचा कोटा; प्रवाशांना दिलासा
By अविनाश कोळी | Updated: March 31, 2024 13:40 IST2024-03-31T13:38:08+5:302024-03-31T13:40:53+5:30
परतीच्या प्रवासातही जादा तिकिटे

कोल्हापूर-अहमदाबाद एक्स्प्रेससाठी सांगलीला ३३५ तिकिटांचा कोटा; प्रवाशांना दिलासा
अविनाश कोळी, लोकमत न्यूज नेटवर्क, सांगली: कोल्हापूर-अहमदाबाद एक्स्प्रेसअंतर्गत सांगली स्थानकावरून ३३५ तिकीटे व अहमदाबाद ते सांगली ३३५ तिकीटे असा कोटा मिळाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.
अहमदाबादला जाणारी ही गाडी नेहमीच फुल्ल होते. त्यामुळे तिकिटांचा कोटा वाढल्याने येथील प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. सांगली स्थानकावरून अनेक गाड्यांसाठी आता तिकिटाचा कोटा वाढत आहे. कोल्हापूर-अहमदाबाद एक्स्प्रेसकरिता येता - जाता मोठा तिकीट कोटा मिळाला आहे. प्रवासी संघटनांनीही याबाबत समाधान व्यक्त केले आहे. प्रवाशांनी या गाडीचे बुकिंग करताना स्टेशन सांगली व बोर्डींग स्टेशन सांगली लिहावे, असे आवाहन रेल्वे डेव्हलपमेंट ग्रुपच्या वतीने करण्यात आले आहे.
कोल्हापूर - अहमदाबादसाठी सांगलीतून तिकीट कोटा
- स्लीपर क्लास - २४९ तिकिटे
- एसी स्लीपर - ८६ तिकिटे
- एकूण - ३३५ तिकिटे