पुणे-कोल्हापूर विशेष रेल्वेला आणखी तीन महिने मुदतवाढ

By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2024 12:13 PM2024-03-28T12:13:55+5:302024-03-28T12:14:53+5:30

या विशेष रेल्वेची दि. ३१ मार्चपर्यंत मुदत होती

Pune-Kolhapur Special Railway extended for another three months | पुणे-कोल्हापूर विशेष रेल्वेला आणखी तीन महिने मुदतवाढ

पुणे-कोल्हापूर विशेष रेल्वेला आणखी तीन महिने मुदतवाढ

मिरज (जि. सांगली) : उन्हाळी सुटीत प्रवाशांची गर्दी असल्याने मध्य रेल्वेने पुणे-कोल्हापूर विशेष रेल्वेला ३१ जूनपर्यंत तीन महिने मुदतवाढ दिली आहे. यामुळे प्रवाशांची सोय होणार आहे.

कोल्हापूर-मुंबई सह्याद्री एक्स्प्रेस कोविड काळात बंद करण्यात आल्याने पुणे-कोल्हापूर विशेष रेल्वे ३१ मार्चपर्यंत सुरू करण्यात आली होती. या विशेष रेल्वेला आणखी तीन महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली आहे. रेल्वे क्रमांक ०१०२३ पुणे-छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूर या विशेष रेल्वेची दि. ३१ मार्चपर्यंत मुदत होती. 

ही विशेष रेल्वे दि. १ एप्रिल ते दि. ३० जूनपर्यंत आणखी तीन महिने धावणार आहे. या गाडीच्या ९१ फेऱ्या होणार आहेत. रेल्वे क्र. ०१०२४ छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूर ते पुणे विशेष रेल्वे १ एप्रिलपासून दि. ३० जूनपर्यंत आणखी ९१ फेऱ्या करणार आहे.

Web Title: Pune-Kolhapur Special Railway extended for another three months

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.