शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्सची १० वर्षांनी स्वप्नपूर्ती! गौतम गंभीरनं केला कुणालाच न जमलेला करिष्मा
2
पुण्यातून भाजपला कितीचं लीड मिळणार?; मुरलीधर मोहोळांनी सांगितला आकडा  
3
व्वा! मानलं आजी...साठीच्या वयात दिली परीक्षा अन् पटकावले ९८ टक्के गुण! 
4
केकेआरच्या बॉलर्सनी बुकींच्या तिजोरीत ओतली कोट्यवधींची गंगाजळी
5
Kavya Maran रडली, पण SRH च्या खेळाडूंचे मनोबल उंचावण्यासाठी रोखला अश्रूंचा बांध, Video 
6
मतमोजणीवेळी बीडमधील 'या' अधिकाऱ्यांना दूर ठेवा; बजरंग सोनवणेंची निवडणूक आयोगाकडे मागणी
7
हैदराबादची हाराकिरी, विराट कोहलीची चांदी! IPL इतिहासात नोंदवला विक्रम भारी 
8
आयर्लंडला जाणारी कतार एअरवेजची फ्लाइट टर्ब्युलन्समध्ये अडकली, 12 जखमी...
9
'रेमल' चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर हाय अलर्ट; पंतप्रधान मोदींनी बोलावली आढावा बैठक
10
KKR vs SRH Final : मिचेल स्टार्कने टाकला Ball of the season! हैदराबादचे ३ फलंदाज तंबूत, Video 
11
मिचेल स्टार्कमुळे जान्हवी कपूर निराश झाली; तिचा Video पाहून बेस्ट ॲक्टिंग पुरस्काराची होतेय मागणी 
12
राजस्थानमध्ये भीषण गरमी; भारत-पाक बॉर्डरवर 55 डिग्री तापमानात BSF जवानांची देशसेवा...
13
भांग पिऊन विमानात चढला अन्..., IndiGo फ्लाइटमध्ये प्रवाशाचा गोंधळ!
14
घरोघरी जात दूध विकलं; मजुरी करणाऱ्या 'त्याने' आज ८०० कोटींचा व्यवसाय उभारला
15
ओडिशात भाजपा उमेदवारावर ईव्हीएमची तोडफोड केल्याचा आरोप, तुरुंगात रवानगी
16
रिषभ पंत आनंदाने केक भरवायला गेला अन् रोहित शर्माने नकार दिला, म्हणाला... Video Viral  
17
ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांना मोठा धक्का, निवडणुकीपूर्वी 78 नेत्यांनी साथ सोडली
18
धोखेबाज नवरदेव! २ बायका फजिती ऐका; तिसरे लग्न करताना 'डाव' फसला, दोन्ही पत्नींची एन्ट्री
19
टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक होण्यास मी तयार, पण...; गौतम गंभीरची BCCI समोर अट 
20
"सावकाराकडून शेतकऱ्याला ट्रॅक्टरखाली चिरडण्याचा प्रयत्न"; वडेट्टीवार म्हणतात, " आता तरी सेटलमेंट..."

मिरजेतील खासगी रुग्णालये मोकळी पडली : संपूर्ण वैद्यकीय क्षेत्राला फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 03, 2020 12:09 AM

वैद्यकीय उपचार क्षेत्रामुळे मिरजेत मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती झाली आहे. सुमारे दोनशे खासगी रुग्णालयांची दररोज कोट्यवधीची उलाढाल आहे. वैद्यकीय उपचाराशी संलग्न रूग्णवाहिका, औषध विक्री, वैद्यकीय प्रयोगशाळा, नर्सिंग, रूग्णालय कर्मचारी, जैविक कचरा निर्मूलन व्यवस्था आदी विविध घटकांचा रोजगार यामुळे ठप्प झाला आहे.

ठळक मुद्देलॉकडाऊन व कोरोनाची भीती , रोजगाराला ब्रेक; दररोजची कोट्यवधींची उलाढाल ठप्प

सदानंद औंधे ।मिरज : लॉकडाऊन व कोरोनाच्या भीतीमुळे मिरजेतील वैद्यकीय क्षेत्राला फटका बसला आहे. दररोजची कोट्यवधींची उलाढाल थंडावली आहे. रुग्णच नसल्याने अनेक खासगी रुग्णालये मोकळी पडल्याचे चित्र आहे.

वैद्यकीय पंढरी असा लौकिक असलेल्या मिरजेत वैद्यकीय व्यवसायाची दीडशे वर्षांची परंपरा आहे. मुंबई, पुण्यासह मोठ्या शहरात उपलब्ध असलेले अत्याधुनिक वैद्यकीय उपचार मिरजेत उपलब्ध असल्याने येथे जिल्ह्यासह शेजारील कर्नाटकातून दररोज मोठ्या संख्येने रुग्ण उपचारासाठी येतात. वैद्यकीय क्षेत्राशी संलग्न फार्मसी, प्रयोगशाळा, रेडिओलॉजी तंत्रज्ञ, भौतिकोपचार यासह अनेकांचा रोजगार वैद्यकीय व्यवसायावर अवलंबून आहे. मिशन हॉस्पिटल, भारती वैद्यकीय महाविद्यालय रूग्णालय, सिध्दिविनायक गणपती कर्करोग हॉस्पिटल, सेवा सदन हॉस्पिटल, लायन्स नॅब नेत्ररुग्णालय यांसारख्या वैद्यकीय संस्थांमध्ये मोठ्या संख्येने रूग्ण येतात. प्लास्टिक सर्जरी, नेत्र, मेंदूविकार, मनोविकार, शल्यचिकित्सा, वंध्यत्व निवारण, मूत्रपिंड उपचार, अवयवरोपण, पेशीरोपण, स्त्रीरोग, हदयरोग अस्थिव्यंग, कर्करोग, दुर्बिणीद्वारे विविध शस्त्रक्रिया, सांधेरोपण, कर्करोगावर न्यूक्लिअर मेडिसीन, रेडिएशन, हृदयरुग्णांसाठी अ‍ॅन्जीओप्लास्टी, बोनमॅरो, मूत्रपिंडरोपण यांसह विविध शस्त्रक्रिया व उपचारांमुळे मिरजेतील वैद्यकीय क्षेत्रात मोठी आर्थिक उलाढाल होते.

खासगी रुग्णालयांत दररोज मोठी गर्दी असते. मात्र सध्या रुग्णच नसल्याने रुग्णालयांसोबतच एमआरआय, सीटीस्कॅन अशा आजाराचे निदान करणाऱ्या अद्ययावत तपासणी केंद्रातही काम नसल्याचे चित्र आहे. कोरोनाच्या भीतीमुळे अनेक रुग्णांनी शस्त्रक्रिया लांबणीवर टाकल्या आहेत. या क्षेत्रातील आर्थिक उलाढाल बंद आहे. वैद्यकीय उपचार क्षेत्रामुळे मिरजेत मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती झाली आहे. सुमारे दोनशे खासगी रुग्णालयांची दररोज कोट्यवधीची उलाढाल आहे. वैद्यकीय उपचाराशी संलग्न रूग्णवाहिका, औषध विक्री, वैद्यकीय प्रयोगशाळा, नर्सिंग, रूग्णालय कर्मचारी, जैविक कचरा निर्मूलन व्यवस्था आदी विविध घटकांचा रोजगार यामुळे ठप्प झाला आहे.

संचारबंदी, एसटी, रेल्वे वाहतूक व सीमा बंद झाल्याने कर्नाटकातील रुग्ण येत नसल्याने, अनेक खासगी रुग्णालयांसह भारती व मिशन रुग्णालयात हाताच्या बोटावर मोजण्याएवढेच रुग्ण आहेत. दैनंदिन उलाढाल थांबली असून, दैनंदिन खर्च मात्र सुरु आहे.संचारबंदीमुळे रुग्ण व कर्मचाऱ्यांच्या जेवणाची व्यवस्था करावी लागत आहे. लॉकडाऊनमुळे खासगी रुग्णालय चालक अडचणीत आले आहेत.

९५0 कर्मचाऱ्यांना : ओळखपत्रे देणारमिरजेतील सुमारे दोनशे खासगी रुग्णालयांतील ९५० कर्मचाऱ्यांना संचारबंदीदरम्यान ये-जा करण्यासाठी रुग्णालयाची ओळखपत्रे आहेत. मात्र तरीही काही रुग्णालय कर्मचाºयांना पोलिसांकडून मारहाणीचे प्रकार घडल्याने प्रशासनाने कर्मचाºयांना ओळखपत्रे देण्याची मागणी आयएमएने केली आहे. आता त्यांना महापालिका ओळखपत्रे देणार आहे.

 

टॅग्स :Sangliसांगलीhospitalहॉस्पिटल