शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
4
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
5
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
6
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
7
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
8
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
9
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
10
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
11
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
12
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
13
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
14
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
15
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
16
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
17
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
18
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
19
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
20
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
Daily Top 2Weekly Top 5

Sangli-Local Body Election: शिराळ्यातील महायुतीचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार पृथ्वीसिंग नाईक सर्वांत 'श्रीमंत'

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2025 17:48 IST

निखिल कांबळे सर्वात ‘गरीब’ उमेदवार !, आर्थिकदृष्ट्या उमेदवारांमध्ये प्रचंड विषमता

विकास शहाशिराळा : शिराळा नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत उतरलेल्या आठ उमेदवारांच्या प्रतिज्ञापत्रांची माहिती समोर आली असून, आर्थिकदृष्ट्या उमेदवारांमध्ये प्रचंड विषमता असल्याचे स्पष्ट झाले आहे. तरुण उमेदवार पृथ्वीसिंग नाईक (वय २९) हे या स्पर्धेत सर्वांत श्रीमंत तर नोकरी करणारे निखिल कांबळे (वय ३३) हे सर्वांत कमी मालमत्ता असलेले उमेदवार ठरले आहेत.पृथ्वीसिंग नाईक यांची एकूण मालमत्ता तब्बल १ कोटी २४ लाख रुपये आहे. त्यांच्या नावावर ५८.६९ लाखांची महागडी गाडी, ७७.५३ लाखांचे जंगम दागिने, तर ४६ लाखांची स्थावर मालमत्ता आहे. वार्षिक उत्पन्न ७.७५ लाख असून, त्यांच्यावर १८.८७ लाखांचे कर्ज आहे. रिंगणात ते सर्वाधिक संपन्न उमेदवार ठरले आहेत.

वाचा : आष्टा नगरपरिषदेसाठी कोट्यधीश उमेदवारांची गर्दी, सर्वात श्रीमंत कोण...नोकरी करणारे निखिल कांबळे यांची मालमत्ता केवळ ३.०६ लाख रुपये आहे. त्यांच्याकडे १.७० लाखाचे वाहन, ४५ हजारांचे वार्षिक उत्पन्न आणि विशेष म्हणजे कुठलाही कर्जाचा बोजा नाही. दागिने फक्त १.२ लाखाचे आहेत.

वाचा : आटपाडीत नगराध्यक्षपदाच्या शर्यतीत एक उमेदवार कोट्यधीश, बाकी लक्षाधीशप्रदीप जोशी (वय ६७) यांच्याकडे तब्बल ३९.३५ लाखांचे दागिने असून, त्यांच्या एकूण मालमत्तेची रक्कम ६०.४० लाख आहे. वार्षिक उत्पन्न ५ लाख रुपये, तर २४ हजारांचे देणे आहे. विशेष म्हणजे, पृथ्वीसिंग नाईक यांच्या पत्नीच्या नावावर तसेच निखिल कांबळे यांच्या स्वतःच्या नावावर कुठलेही दागिने नाहीत. शिराळा नगराध्यक्ष निवडणुकीत उमेदवारांची आर्थिक ताकद व परिस्थिती यात मोठी तफावत असल्याचे हे प्रतिज्ञापत्र स्पष्ट चित्र दाखवते.

वाचा : विट्यात नगराध्यक्षपदाच्या उमेदवारांची मालमत्ता किती, सर्वात श्रीमंत कोण...

इतर उमेदवारांच्या मालमत्ता खालीलप्रमाणे

  • वसंत कांबळे (४०) : एकूण २१.७७ लाख; उत्पन्न ४५ हजार.
  • अभिजित नाईक (४७) : एकूण ७४.६४ लाख; उत्पन्न ४.५ लाख, देणे ४.३० लाख.
  • श्रीराम नांगरे पाटील (३३) : एकूण २१.०७ लाख; देणे ४.२५ लाख
  • मारुती रोकडे (४२) : मालमत्ता ३.२२ लाख; उत्पन्न २.७० लाख.
  • सम्राट शिंदे (४८) : एकूण ७६.७० लाख; उत्पन्न ५ लाख, देणे ६० हजार.
English
हिंदी सारांश
Web Title : Shirala Election: Naik is Richest Candidate; Kamble Has Least Assets

Web Summary : Prithvisingh Naik, with ₹1.24 crore, is the richest candidate in Shirala's Nagar Panchayat election. Nikhil Kamble has the lowest assets at ₹3.06 lakh. Other candidates' assets range from ₹3.22 lakh to ₹76.70 lakh, revealing financial disparities.