शहरं
Join us  
Trending Stories
1
Heatwave: तिकडे अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’, इकडे सांगलीमध्ये गारांसह वादळी पाऊस!
2
Middle East War: करार करा अन्यथा तुमचा विनाश अटळ; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला इशारा
3
Drugs Racket: टिटवाळ्याच्या आलिशान घरातून ‘ती’ मुंबईत चालवत होती ड्रग्ज रॅकेट!
4
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
5
धार्मिक चालीरितींचे पालन करण्याचा कार्यालयातील तरुणींवर दबाव, नागपुरातील एनजीओ चालकाला अटक
6
मृत्यूनंतर ५० दिवस उलटले, तरी अयातुल्ला अली खामेनेईंच्या अंत्यविधीचा पत्ता नाही; इराण नक्की कशाला घाबरतोय?
7
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
8
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
9
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
10
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
11
Tanvi Kolte: 'बिग बॉस मराठी ६'ची विजेती तन्वी कोलतेचं घराबाहेर जाताना मोठं विधान, म्हणाली- "मी आता एक ब्रँड म्हणून..."
12
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
13
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
14
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
15
Bigg Boss Marathi 6: अनुश्री माने गेली घराबाहेर! 'बिग बॉस मराठी ६'चा प्रवास संपला, विशाल रडला
16
शतकासाठी नव्हे आम्ही संघासाठी खेळतो! प्रियांश-कूपर जोडीचा सुपर हिट शो; एका डावात अनेक विक्रम
17
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
18
पापणी लवते न लवते तोच... 'खेळ खल्लास!' Dhruv Jurel च्या स्टंपिंगला 'क्रिकेटच्या देवा'नंही दिली दाद
19
Bigg Boss Marathi 6: 'हा' स्पर्धक गेला घराबाहेर! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का
20
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
Daily Top 2Weekly Top 5

साथीचे आजार रोखा अन्यथा युवक राष्ट्रवादी औषध फवारणी करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2021 04:29 IST

इस्लामपूर येथे शहर युवक राष्ट्रवादीच्या वतीने नगरपालिकेचे प्रभारी मुख्याधिकारी कैलास चव्हाण यांना निवेदन देण्यात आले. यावेळी सचिन कोळी, स्वरूप ...

इस्लामपूर येथे शहर युवक राष्ट्रवादीच्या वतीने नगरपालिकेचे प्रभारी मुख्याधिकारी कैलास चव्हाण यांना निवेदन देण्यात आले. यावेळी सचिन कोळी, स्वरूप मोरे, सागर जाधव, अभिजित पाटील, शिवराज पाटील, अभिजित कुर्लेकर उपस्थित होते.

लोकमत न्यूज नेटवर्क

इस्लामपूर : इस्लामपूर शहरातील जनता डेंग्यू व चिकुन गुन्यासारख्या साथीने त्रस्त आहे. मात्र इस्लामपूर नगरपालिकेला याचे गांभीर्य नाही. नगरपालिकेने येत्या १०-१२ दिवसांत शहरात औषध फवारणी व योग्य त्या उपाययोजना कराव्यात अन्यथा ५ सप्टेंबरनंतर संपूर्ण शहरात औषध फवारणी करू, असा इशारा शहर युवक राष्ट्रवादीतर्फे देण्यात आला आहे. याबाबत प्रभारी मुख्याधिकारी कैलास चव्हाण यांना निवेदन देण्यात आले.

उपनगराध्यक्ष दादासाहेब पाटील, शहराध्यक्ष शहाजी पाटील, नगरसेवक खंडेराव जाधव, आनंदराव मलगुंडे, महिला शहराध्यक्षा रोझा किणीकर, युवक शहराध्यक्ष सचिन कोळी, कार्याध्यक्ष स्वरूप मोरे यांनी नेतृत्व केले.

युवक शहराध्यक्ष सचिन कोळी म्हणाले, शहरातील जनता साथीच्या आजारांनी त्रस्त आहे. नगरपालिकेने तातडीने औषध फवारणी करावी. अन्यथा आम्ही आंदोलन न करता युवा नेते प्रतीक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात औषध फवारणी करू. जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्याकडे शासकीय रुग्णालयात डेंग्यू तपासणीची प्रयोगशाळा मंजूर करण्यासाठी पाठपुरावा करीत आहोत.

दादासाहेब पाटील म्हणाले, नगराध्यक्षांच्या मनमानी कारभाराने शहराची अवस्था बिकट झाली आहे. युवक राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी शहरातील विविध प्रश्नांवर आंदोलने करून सत्ताधाऱ्यांना जाग आणावी.

जाधव म्हणाले, युवक राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी शहरातील जनतेच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नावर आवाज उठविला आहे. आज मोर्चास परवानगी न मिळाल्याने आपण निवेदन देत आहोत.

शहाजी पाटील म्हणाले, शहरातील नागरी सुविधांचा बोजवारा उठला आहे. सत्ताधाऱ्यांनी शहर १५ वर्षे मागे नेले आहे. स्वरूप मोरे, रोझा किणीकर, विशाल सूर्यवंशी, गोपाल नागे यांनी मनोगत व्यक्त केले.

यावेळी शिवराज पाटील, अभिजित पाटील, सागर जाधव, अभिजित कुर्लेकर, अभिजित रासकर, अभिजित भगवान पाटील, उदय कांबळे, संतोष ताटे, दादासाहेब सूर्यवंशी, अंकुश जाधव, नगरसेविका सुनीता सपकाळ, जयश्री पाटील, जयश्री माळी, शकील जमादार, मोहन भिंगार्डे, रणजित तेवरे, जुबेर खाटीक उपस्थित होते.