शहरं
Join us  
Trending Stories
1
आता ओबीसींचे वादळ रस्त्यावर;  ...तर मुंबई, ठाणे, पुणे जाम करू !
2
आजचे राशीभविष्य : शनिवार ११ ऑक्टोबर २०२५; अचानक धनलाभ होईल, हितशत्रू सरसावतील, एखाद्या स्त्रीमुळे अडचणीत याल
3
संपादकीय: राखेतून शांतता उगवेल? ट्रम्प इस्रायल-हमास युद्ध थांबवू शकणार?
4
नोबेल पुरस्कारापासून वंचित ट्रम्प यांचा रागाने थयथयाट; मारिया मचाडो यांना यंदाचा शांततेचा नोबेल पुरस्कार  
5
लाडक्या बहिणींना ‘दिवाळी भेट’; सप्टेंबरचा हप्ता थेट खात्यात जमा
6
मंत्र्यांना फर्मान : आश्वासने दिली तर ती ९० दिवसांत पूर्णही करा !
7
आमदार विलास भुमरे म्हणाले, २० हजार मतदार बाहेरून आणले 
8
नोबेल नायतर नाय, तात्यांना थेट ‘महा-नोबेल’च! गावातच भांडणं लावायला आणि ती ‘मिटवायला’...
9
तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; नियोजन करून पडा बाहेर
10
शाळांमध्ये तिसऱ्या भाषेची सक्ती नकोच; प्रश्नावलीची गरज तरी काय? भाषातज्ज्ञांकडून प्रश्न उपस्थित
11
‘अर‌-ट्टाय’ काय आहे? ते व्हॉट्सॲपला पर्याय ठरेल? 
12
आधी धुरळा कुणाचा? जिल्हा परिषद, नगरपालिका निवडणुकीबाबत निर्णय दिवाळीनंतर
13
घुंगट, बुरखाधारी महिला मतदारांची पटवणार ओळख; बिहार निवडणुकीत घेणार अंगणवाडी सेविकांची मदत
14
दहशतवादासाठी आमची भूमी वापरू देणार नाही; अफगाणिस्तानचे भारताला आश्वासन
15
शांततेचा नोबेल: हुकूमशाहीकडून लोकशाहीकडे नेणारी रणरागिणी; २० वर्षांचा लढा जिंकली
16
प्रवीण आमरेने दिलेले बूट नाही विसरणार : सचिन तेंडुलकर
17
अमली पदार्थ तस्करीत १०० कोटींचे व्यवहार; ईडीचे नऊ ठिकाणी छापे
18
चांगले साहित्य सहानुभूती निर्माण करते; ‘अनंतरंग’ सांस्कृतिक महोत्सवात गीतकार जावेद अख्तर यांचे प्रतिपादन
19
लष्करात नेमणूक झाल्यावर भव्य मिरवणूक, जंगी स्वागत; सत्य समजताच सरकली पायाखालची जमीन
20
यशस्वी जयस्वालनं वेस्ट इंडिजला झोडलं, एकाच खेळीत मोडले अनेक मोठे विक्रम!

पुणे शिक्षक मतदारसंघासाठी इच्छुकांचे गुडघ्याला बाशिंग, संघटनेतील उमेदवारांचे नेत्यांकडे हेलपाटे सुरु

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2025 19:11 IST

सांगलीतून तगड्या उमेदवारीची वानवा

किर्लोस्करवाडी : पुणेशिक्षक मतदारसंघ निवडणूक २०२६ साठी इच्छुक उमेदवारांनी कंबर कसली असून शाळांना भेटी देत मतदार नोंदणीचे अर्ज भरून घेण्याचा धडाका लावला आहे. जरी निवडणुकीला सव्वा वर्षाचा अवधी उरलेला असला तरी वातावरण ढवळून निघाले आहे. विद्यमान आमदार जयंत आसगावकर यांच्यासोबत माजी आमदार दत्तात्रय सावंत, विनाअनुदानित कृती समितीचे खंडेराव जगदाळे आणि शिवसेना शिंदे गटाचे मंगेश चिवटे यांची नावे सद्यःस्थितीत चर्चेत आहेत.मागील निवडणुकीत महाविकास आघाडीतर्फे आसगावकर यांनी दत्तात्रय सावंत यांचा पराभव केला होता. त्यांनी आमदार निधी इतर कामांसाठी न वापरता शाळांना शैक्षणिक साहित्य वाटप करत सर्व शाळांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला आहे. यावेळी देखील त्यांनाच महाविकास आघाडीची उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे.माजी आमदार दत्तात्रय सावंत यांनी गत निवडणुकीत पराभूत झाल्यावरही शिक्षकांच्या प्रश्नांसाठी पुणे, मुंबईसह संपूर्ण मतदारसंघात निरंतर पाठपुरावा सुरू ठेवला आहे. शिवाय पाचही जिल्ह्यांत त्यांनी मतदार नोंदणीचे अर्ज भरत आघाडी घेतली आहे. विनाअनुदानित शाळा कृती समितीचे खंडेराव जगदाळे हे गेल्या पंचवीस वर्षांपासून चळवळीमध्ये सक्रिय असून या, लोकांना १००% अनुदान मिळावे, यासाठी दहा वर्षांपासून अनवाणी फिरत आहेत. टप्पा अनुदानासाठी त्यांनी दोनशेहून अधिक आंदोलने केली आहेत. मागीलवेळी त्यांनी माघार घेत आसगावकर यांना पाठिंबा दिला होता; परंतु यावेळी कोणत्याही परिस्थितीत माघार न घेण्याचा त्यांचा निर्धार आहे.मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाचे प्रमुख करमाळा येथील मंगेश चिवटे यांनीही उमेदवारीसाठी प्रयत्न सुरू केले असून, शिक्षकांसाठी कॅशलेस आरोग्य योजना लागू करण्याचे आश्वासन दिले आहे. एकंदर, निवडणुकीस अजून सव्वा वर्ष बाकी असतानाही इच्छुकांनी जोरदार तयारी केली आहे. २०२० पासून या निवडणुकांत राजकीय पक्ष उतरल्यामुळे निवडणुकीला कॉर्पोरेट स्वरूप आले आहे. यामुळे शिक्षक संघटनेच्या उमेदवारांनी विविध राजकीय पक्षांचे उंबरे झिजवायला आधीपासूनच सुरुवात केली आहे.

सांगलीतून तगड्या उमेदवारीची वानवासांगली जिल्ह्याला आतापर्यंत भगवान साळुंखे आणि गजेंद्र ऐनापुरे असे दोन आमदार लाभले असून, यावेळी सांगलीमधून कुणीही तगडा उमेदवार नसल्याचे चित्र आहे. पुणे शिक्षक मतदारसंघाचा कार्यक्षेत्र सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर आणि पुणे जिल्ह्यांतील एकूण ५८ तालुक्यांचा समावेश आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Pune Teacher Constituency: Aspirants Gear Up; Leaders Courted Early.

Web Summary : Pune teacher constituency heats up for 2026. Several candidates are vying for nomination. Incumbent Jayant Asgaonkar faces competition. Focus is on voter registration and teachers' issues. Political parties involvement gives election corporate look.