शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
2
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
3
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
4
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
5
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
6
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
7
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
8
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
9
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
10
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
11
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
12
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
13
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
14
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
15
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
16
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
17
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
18
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
19
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
20
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील सत्ता लवकरच आपल्याकडे येईल

By admin | Updated: November 25, 2015 00:32 IST

शरद पवार : बोरगाव येथील हिंदमाता शिक्षण मंडळाच्या नूतन इमारतीचे उद्घाटन

बोरगाव : आम्ही अनेकवेळा सत्तेच्या बाहेर होतो. त्याला आम्ही कधीच डगमगलो नाही. सत्ता लवकरच आपल्याकडे येईल, तोपर्यंत आपण एकदिलाने व प्रामाणिकपणाने शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे पाहणार असल्याचे मत माजी केंदीय कृषिमंत्री शरद पवार यांनी बोरगाव (ता. वाळवा) येथील हिंदमाता शिक्षण संकुलाच्या नूतन इमारतीचे उद्घाटन व मान्यवरांच्या सत्कार कार्यक्रमात व्यक्त केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जयंत पाटील होते.पवार पुढे म्हणाले, शेतीबरोबर आधुनिक शिक्षणाकडे वळण्याची गरज असून, शेती एके शेती करण्याचे दिवस आता राहिले नाहीत. त्यासाठी उच्च विद्याविभूषित होऊन तरुणांनी स्वत:बरोबर देशाचाही नावलौकिक करावा. ११५ कोटी लोकसंख्येच्या देशात ६० टक्के लोक आज शेती करत आहेत. जमीन क्षेत्र कमी होऊ लागले, शेतीवर अवलंबून राहणाऱ्यांची संख्या वाढत गेली. याला प्रगती म्हणावी का? शेतीतील नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करण्याची गरज असून आम्ही आठ महिन्यात कारखान्याला गाळपासाठी पाठवणारे उसाचे वाण विकसित करीत आहोत. या बदलामुळे आमची अर्थव्यवस्था नक्की बदलेल यात शंका नाही. यासाठी ऊस वाणावर संशोधन करण्यासाठी एक समिती इंडोनेशियाला पाठवली आहे.जयंत पाटील म्हणाले, नव्या गोष्टींचा ध्यास व आदर्श ठेवण्याचे काम या गावाबरोबर परिसराने कायम दाखवून दिलेले आहे. माझ्या ३८ वर्षांच्या राजकीय कारकीर्दीत प्रेरणा व प्रेमाची सावली या गावाने दिली. संस्थेचे मानद सचिव माणिकराव पाटील म्हणाले, विधायक नेतृत्व पाठीशी राहिल्याने आज मी गावात शिक्षणाची गंगा आणू शकलो, असे मत व्यक्त केले. स्वागत विष्णुपंत शिंदे यांनी केले, तर आभार संस्थेचे उपाध्यक्ष मारुती पाटील यांनी मानले. संस्थेचे अध्यक्ष रामराव देशमुख यांचा व संस्थेस जागा दिल्याबद्दल मुरारराव शिंदे यांचा सत्कार पवार यांच्याहस्ते केला. यावेळी भगतदादा पाटील, माजी आमदार मानसिंगराव नाईक, खंडेराव जगताप, विनायक पाटील, बाळासाहेब लाड, बी. एस. पाटील, विक्रम पाटील, बाबासाहेब मुळीक, सहसचिव संजय पाटील, अभिजित पाटील, विश्वजित पाटील, शामराव पाटील आदी उपस्थित होते. (वार्ताहर)