शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगळुरूला धक्का, अहमदाबादमध्ये खेळवली जाणार IPL 2026 ची फायनल, प्लेऑफचं वेळापत्रक जाहीर
2
पाकिस्तानकडून आता दारू विकायला सुरुवात! ५० वर्षांपूर्वी 'हराम' म्हणून केलेली बॅन, पैसा कमवायच्या नादात...
3
सम्राट चौधरींचा मंत्रिमंडळ विस्तार 'पावसात वाहून गेला'; गांधी मैदानात चिखलाचे साम्राज्य
4
West Bengal Violence: हिंसेचा भडका! भाजपा आमदाराच्या भावाची हत्या, हिंसाचारात आतापर्यंत चौघांचा मृत्यू; जवानांवरही गोळीबार
5
"नुसतं नावाला 'घरचं मैदान', पिच बनवताना आम्हाला विचारत नाहीत.."; DC च्या कोचचा राग अनावर
6
इराकची जगाला मोठी 'ऑफर'! ११००० रुपयांचा कच्च्या तेलाचा बॅरल ३१०० रुपयांत देणार; अट फक्त एकच...
7
Top Marathi News LIVE: प. बंगालमध्ये निकालानंतर हिंसाचार थांबेना, जमावाने लेनिनचा पुतळा तोडला...
8
नशीब असावं तर थलापती विजयसारखं...! आधी TVK चा मोठा विजय अन् आता समोरून आली Good News
9
तामिळनाडूच्या राजकारणात मोठा ट्विस्ट; AIADMK चा TVK ला बाहेरून पाठिंबा देण्याचा निर्णय!
10
Punjab Blast: पंजाब हादरलं! ३ तासांत २ मोठे धमाके; अमृतसर आणि जालंधरमध्ये नेमकं काय घडलं? वाचा संपूर्ण टाइमलाईन
11
एका फुग्यावरून वाद अन् तरुणाचा बळी! उत्तम नगर मर्डर केसमध्ये धक्कादायक खुलासे
12
लोन फेडलं नाही तर बँक जप्त करू शकते तुमची प्रॉपर्टी; RBI नं जारी केले नवे ड्राफ्ट नियम
13
पश्चिम बंगालचा निकाल येताच अखिलेश यादव यांचा मोठा निर्णय; समाजवादी पार्टीने IPAC सोबतची डील केली रद्द
14
DC vs CSK : वाऱ्यानं बेल्स पडल्या, मग Nitish Rana आउट कसा? डेड बॉल का नाही? नियम काय सांगतो?
15
दिवाळखोर होण्याचं संकट टळलं! कंपनीला क्लिन चीट, शेअरला २०%चं अपर सर्किट; ३० दिवसांत ३३% ची वाढ
16
Numerology: अंकशास्त्रानुसार 'या' ४ मुलांकांच्या स्त्रिया साक्षात लक्ष्मीचं रूप; घरात आणतात अपार सुख-समृद्धी
17
विजय यांच्या टीव्हीकेला पाठिंबा द्या, अन्यथा..., ३० आमदारांचा इशारा, तामिळनाडूत अण्णा द्रमुक फुटीच्या उंबरठ्यावर?
18
मुंबई विमानतळावर ७ मे रोजी ६ तासांचा 'ब्लॉक'; धावपट्टीच्या देखभालीसाठी विमान सेवा राहणार बंद
19
Sanju Samson: संजू सॅमसन सुसाट! डेव्हिड वॉर्नरचा रेकॉर्ड मोडला, एबी डिव्हिलियर्सचा विक्रम धोक्यात
20
अजबच! एकाच आईच्या जुळ्या मुली, पण दोघींचेही वडील वेगवेगळे; DNA रिपोर्टमधून खळबळजनक खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

वांगीतील अतिक्रमणे अखेर जमीनदोस्त...

By admin | Updated: November 23, 2014 23:53 IST

अनुचित प्रकार नाही : पोलीस बंदोबस्तात कारवाई

वांगी : वांगी (ता. कडेगाव) येथील शासनाच्या जागेत गेली ४० वर्षांपासून असणारे अतिक्रमण हटविण्यास वांगी ग्रामपंचायतीस अखेर यश आले आहे.अतिक्रमण हटविताना कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी ग्रामपंचायतीने मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.वांगी येथे गट नं. ३३७ या शासनाच्या मालकीच्या जागेवर ४९४ चौरस मीटरमध्ये पांडुरंग बाबाजी गायकवाड यांनी पक्के घर बांधून जवळपास ४० वर्षांपासून अतिक्रमण केले होते, तर काही लोकांनी गावातील बाजारपेठेच्या मुख्य रस्त्यावर दोन्ही बाजूंनी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले होते. सप्टेंबर २०१३ मध्ये ग्रामपंचायतीने गावातील सर्व अतिक्रमणधारकाना नोटिसा देऊन अतिक्रमण काढण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार काही लोकांनी अतिक्रमणे काढून घेतली होती; तर गायकवाड यांनी न्यायालयात धाव घेतली होती.जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह यांनीदेखील २८ फेबुवारी २०१४ रोजी हे अतिक्रमण तातडीने काढण्याच्या सूचना ग्रामपंचायतीला दिल्या होत्या. त्यानुसार ग्रामपंचायतीने गुरुवार, दि. २० नोव्हेंबर रोजी पोलीस यंत्रणा बोलावून जेसीबीने अतिक्रमण काढण्यास सुरुवात केली. त्यानंतर गायकवाड यांनी भावनिक आवाहन करून दोन दिवसांनी स्वत: अतिक्रमण काढण्याचे सांगितले; मात्र रविवारी २३ नोव्हेंबर रोजी पुन्हा पोलीस बंदोबस्तात ग्रामपंचायतीने जेसीबीच्या सहायाने अतिक्रमण हटविले.यावेळी जि. प. सदस्य सुरेश मोहिते, पंचायत समिती सदस्य सखाराम सूर्यवंशी, सरपंच मनीषा कांबळे, ग्रामसेवक विनायक गोवंडे, तलाठी संभाजी शिरतोडे आदी उपस्थित होते. यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून चिंचणी-वांगी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. (वार्ताहर)४० वर्षांपासूनचे अतिक्रमणवांगी येथील शासनाच्या जागेत गेली ४० वर्षांपासून असणारे अतिक्रमण हटविण्याची सूचना जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह यांनी २८ फेबुवारी रोजी ग्रामपंचायतीला दिली होती. त्यानुसार ग्रामपंचायतीने दि. २० रोजी जेसीबीने अतिक्रमण काढण्यास सुरुवात केली. त्यानंतर गायकवाड यांनी भावनिक आवाहन करून दोन दिवसांनी स्वत: अतिक्रमण काढण्याचे सांगितले; मात्र रविवारी ही अतिक्रमणे हटविण्यात आली.