शहरं
Join us  
Trending Stories
1
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाने राहुल गांधींना सुनावले खडेबोल  
2
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
3
"२० वर्षांनी आम्ही भाऊ एकत्र येऊ शकतो, मग..."; मनसे मेळाव्यात राज ठाकरेंचा कार्यकर्त्यांना कानमंत्र
4
"माझ्या नादी लागू नका, पुराव्यासह फाईल्स उघडू..."; भाजपात प्रवेश करताच शिंदेसेनेच्या नेत्याला इशारा
5
"मुंबईत जो येईल त्याचं स्वागत करू..."; निशिकांत दुबेंबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
6
रॉयल एनफिल्डने चीनचे रेअर अर्थ मटेरिअल टाळले! नवीन धातू वापरला, ऑटो कंपन्या चकीत झाल्या...
7
काहीही करा, ‘हम नही सुधरेंगे’; CM देवेंद्र फडणवीसांचा क्लास वाया, वादग्रस्त विधाने सुरूच!
8
AI घेणार तुमच्या नोकरीची जागा? गुंतवणूकदार विनोद खोसला यांचा इशारा, म्हणाले यातून वाचायचं असेल तर..
9
‘झुकेगा नही’! ट्रम्प यांची धमकी, पण सरकार ठाम; अमेरिकेला भारताचं स्वतंत्र धोरण का खुपतंय?
10
मराठी अभिनेत्याचं साउथ इंडस्ट्रीत काम करण्याचं होतं स्वप्न, लॉकडाऊननंतर हैदराबाद गाठलं अन्...
11
चहा करताना 'ही' छोटीशी चूक कराल तर आयुष्याला मुकाल, योग्य पद्धत कोणती एकदा बघाच
12
ऑपरेशन महादेवमध्ये मारले गेलेले सगळे दहशतवादी पाकिस्तानीच! 'त्या' एका पुराव्याने समोर आली कुंडली
13
IND vs ENG: ३५ धावा की ४ गडी... पाचवी कसोटी निर्णायक वळणावर, 'हा' घटक भारतासाठी ठरेल 'गेमचेंजर'
14
ट्रम्प यांच्यासोबतची मैत्री तुटल्यानंतर मस्क मोठ्या अडचणीत; टेस्लाला द्यावे लागणार तब्बल २ हजार कोटी
15
ट्रम्पच्या जिगरी दोस्तावर पाकिस्तान का चिडला? पोस्ट लिहीत व्यक्त केला राग! शाहबाज शरीफ म्हणाले... 
16
"सचिन माझ्या मुलाचा बाप...", महिलेने दाखवला DNA रिपोर्ट; राजा रघुवंशीच्या घरात भलताच वाद
17
हृदयस्पर्शी! बाळासाठी वडील झाले वासुदेव, पुराच्या पाण्यातून काढली वाट, भावुक करणारा Video
18
Shravan 2025: शास्त्रानुसार, संसारी व्यक्तीने रुद्राक्षाची जपमाळ ओढावी, पण गळ्यात घालू नये!
19
रक्षाबंधन नेमके कधी आहे? शुभ मुहूर्त कोणता? पाहा, महत्त्व, महात्म्य अन् काही मान्यता
20
नोकरीसाठी विदेशात जायचंय तर पत्नीला भारतात ठेवा, अटीविरुद्ध ‘तो’ सुप्रीम कोर्टात

NCP-BJP Politics: राष्ट्रवादीमध्ये फुटीची परंपरा, भाजपाचा फोडाफोडीचा पायंडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2022 17:56 IST

भाजप राष्ट्रवादीतील कुरघोड्यांचे राजकारण चर्चेत

दत्ता पाटीलतासगाव : कवठेमहांकाळ नगरपंचायतीतील राष्ट्रवादीच्या सत्तेला सुरुंग लावून खासदार संजयकाका पाटील यांनी भाजपचा नगराध्यक्ष केला. यामुळे भाजप राष्ट्रवादीतील कुरघोड्यांचे राजकारण चर्चेत आले. राष्ट्रवादीत निवडून आलेल्या पदाधिकाऱ्यांच्या फुटीचा, तर भाजपमध्ये राष्ट्रवादीचे पदाधिकारी फोडून इनकमिंग करण्याचा पायंडाच बनल्याचे चित्र आहे. दोन्ही पक्षांतील नेत्यांची परिस्थिती पाहता तर खासदार गटाला निवडणुकीत, तर आमदार गटाला सत्तेत आल्यानंतर आत्मपरीक्षण करण्याची गरज असल्याचे चित्र आहे.कवठेमहांकाळ नगरपंचायतीत राष्ट्रवादी विरुद्ध सर्व गट अशी निवडणूक काही महिन्यांपूर्वी झाली. युवा नेते रोहित पाटील यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीची एकहाती सत्ता आली. पक्षांतर्गत धोरणानुसार नगराध्यक्ष बदलाचा निर्णय झाला. पुढील नगराध्यक्षाच्या नावावर शिक्कामोर्तबही झाले. मात्र याच काळात राष्ट्रवादीतील दुहीचा फायदा घेत खासदार संजयकाका पाटील यांनी राष्ट्रवादीचे नगरसेवक गळाला लावून भाजपचा नगराध्यक्ष करण्याची किमया केली.खासदारांच्या फोडाफोडीनंतर आमदार विरुद्ध खासदार गटातील राजकारण चर्चेत आले. मात्र, दोन्ही गटातील फुटाफुटीचा जुनाच पायंडा कायम राहिल्याचे चित्र यानिमित्ताने पाहायला मिळाले.तासगाव नगरपालिकेत आर. आर. पाटील आणि संजयकाका पाटील गटात फूट पडल्यानंतर खासदार गटाने फोडाफोडीचा प्रयत्न केला होता. मात्र, पहिला प्रयत्न अपयशी ठरला. आर. आर. पाटील यांच्या पश्चात खासदार गटाने राष्ट्रवादीच्या नगरसेवकांना फोडून भाजपचा नगराध्यक्ष केला होता.

त्यानंतरच्या जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीत राष्ट्रवादीतील नाराजांना भाजपमध्ये घेऊन उमेदवारी दिली. दरम्यानच्या काळात जिल्हा बँकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीतील नाराजीचा फायदा घेत राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा पराभव केला. कवठेमहांकाळमध्ये झालेले फोडाफोडीचे राजकारण तासगावचीच पुनरावृत्ती असल्याचे यानिमित्ताने पाहायला मिळाले. मात्र आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, भाजपच्या नेत्यांना निवडणुकीच्या मैदानात आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांना सत्तेच्या रिंगणात आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली आहे.का आहे आत्मपरीक्षणाची गरज?  आमदार गट : आर. आर. पाटील यांच्या पश्चात तासगाव कवठेमहांकाळ-मधील आबा गट संपेल अशी चर्चा असतानादेखील आबा गटाचे अस्तित्व प्रत्येक निवडणुकीत दिसून आले. किंबहुना अपवाद वगळता प्रत्येक निवडणुकीत आबा गटाला घवघवीत यश मिळाले. मात्र निवडणुकीत एकनिष्ठ असणारे अनेक पदाधिकारी, पदावर गेल्यानंतर नाराजीचा सूर ओढून भाजपशी जवळीक करत असल्याचे चित्र वेळोवेळी दिसून येत आहे. त्यामुळेच आत्मपरीक्षण करण्याची गरज आमदार गट किंबहुना रोहित पाटील यांना आहे.खासदार गट : राज्यात सत्तेत असताना आणि समोर तुल्यबळ विरोधक नसतानादेखील खासदार संजयकाका पाटील यांच्या गटाला वेळोवेळी झालेल्या निवडणुकांत अपेक्षित यश मिळाले नाही. नगरपालिकेची सत्ता काठावर मिळाली, तर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत बहुमत मिळवण्यात अपयश आले. राष्ट्रवादीतील अंतर्गत बंडाळीवर भिस्त ठेवणाऱ्या खासदार गटाला निवडणुकीच्या रिंगणात वर्चस्व सिद्ध करण्यात अपेक्षित यश मिळत नसल्याने आत्मपरीक्षणाची गरज आहे.

टॅग्स :SangliसांगलीPoliticsराजकारणNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपाRohit Patilरोहित पाटिल