सांगलीत गर्दी करणाऱ्यांना पोलिसांचा लाठीप्रसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 14:52 IST2021-05-05T14:50:15+5:302021-05-05T14:52:49+5:30
CoronaVirus Sangli : सलग दुसऱ्या दिवशी बुधवारी शहरातील बाजारपेठांमध्ये नागरिकांनी भाजीपाला, किराणा मालाच्या खरेदीसाठी गर्दी केली. मार्केट यार्डमध्ये पुन्हा बेशिस्तपणा दिसून आला. त्यामुळे पोलिसांनी गर्दी हटविणाऱ्यांना लाठीप्रसाद दिला.

सांगलीत गर्दी करणाऱ्यांना पोलिसांचा लाठीप्रसाद
सांगली : सलग दुसऱ्या दिवशी बुधवारी शहरातील बाजारपेठांमध्ये नागरिकांनी भाजीपाला, किराणा मालाच्या खरेदीसाठी गर्दी केली. मार्केट यार्डमध्ये पुन्हा बेशिस्तपणा दिसून आला. त्यामुळे पोलिसांनी गर्दी हटविणाऱ्यांना लाठीप्रसाद दिला.
जिल्ह्यात बुधवारी रात्रीपासून आठ दिवसांचा लॉकडाऊन सुरु झाला, मात्र सकाळी किराणा माल, भाजीपाला, बेकरी पदार्थ, धान्य खरेदी पुन्हा लोक रस्त्यावर आले. त्यामुळे पोलिसांनी कठोर पावले उचलत गर्दी हटविली.
पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम आक्रमक
पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम आक्रमक झाले असून शहरातील रस्त्यावर उतरत त्यांनी बदाम चौकातील सुरू असलेल्या मच्छी मार्केट आणि मटण दुकानांवर धडक कारवाई केली. दुकानदारांना उन्हात बसवुन महापालिकेच्या पथकांना बोलावून दुकाने सील करण्यात आली.