भुईकोट किल्ल्यावरील शाैर्यस्थळाचा आठ दिवसांत आराखडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2021 04:25 IST2021-03-08T04:25:39+5:302021-03-08T04:25:39+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क शिराळा : शिराळा येथील ऐतिहासिक भुईकोट किल्ला परिसरात धर्मवीर संभाजीराजे यांचा अश्वारूढ पुतळा, छत्रपती संभाजीराजे ...

Plan of the shrine at Bhuikot fort in eight days | भुईकोट किल्ल्यावरील शाैर्यस्थळाचा आठ दिवसांत आराखडा

भुईकोट किल्ल्यावरील शाैर्यस्थळाचा आठ दिवसांत आराखडा

लोकमत न्यूज नेटवर्क

शिराळा : शिराळा येथील ऐतिहासिक भुईकोट किल्ला परिसरात धर्मवीर संभाजीराजे यांचा अश्वारूढ पुतळा, छत्रपती संभाजीराजे यांचा जन्मापासून जीवनपरिचय असा शिल्परूपी इतिहास मांडण्यात येणार आहे. यासाठी प्राथमिक आराखडा आठ दिवसांत तयार झाला की नियोजन करण्यासाठी बैठक घेऊ, अशी माहिती खासदार धैर्यशील माने व आमदार मानसिंगराव नाईक यांनी दिली. येथील भुईकोट किल्ल्यावर छत्रपती संभाजी महाराज शाैर्यस्थळाच्या नियोजनासाठी पाहणी दौऱ्यावेळी ते बोलत होते.

सुशोभिकरण करण्यासाठी आराखडयास तयार मान्यता मिळाली असून, यास लागणारा शासनाकडून भरघोस निधी उपलब्ध होईल. यासाठी इतिहास तज्ज्ञ व नागरिकांच्या सूचनांचा विचार करून एक आदर्श शाैर्यस्थळ तयार करण्यात येईल. भुईकोट किल्ल्याची तटबंदी, संभाजीराजे यांचा अश्वारूढ पुतळा, कोटेश्वर मंदिर नूतनीकरण असे नियोजन आहे. सांगली व कोल्हापूर येथील वास्तुरचनाकारांकडून आराखडा तयार करण्यात येणार आहे. आवश्यक ठिकाणी भव्य कमानी, किल्ल्यावर जाणारा मार्ग, तटबंदी, आदी प्रामुख्याने केले जाणार असल्याची माहिती खासदार माने व आमदार नाईक यांनी दिली.

यावेळी नगराध्यक्षा सुनीता निकम, विजयराव नलवडे, विश्वास कदम, अभिजित पाटील, महादेव कदम, गौतम पोटे, अर्चना शेटे, सुनंदा सोनटक्के, नीलेश आवटे, स्वप्नील निकम, प्रतिभा पवार, उपनगराध्यक्ष विजय दळवी, शिल्पा कुरणे, विश्वप्रतापसिंह नाईक आदी उपस्थित होते.

Web Title: Plan of the shrine at Bhuikot fort in eight days