शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaishnavi Hagawane Case : कस्पटे कुटुंबियांच्या भेटीनंतर अजित पवार म्हणाले, 'त्यांनी अजून दोन नावे सांगितली'
2
शिंदेंच्या शिवसेनेत उफाळला वाद! बाजोरिया हटावचा नारा, शिवसैनिकांनी बॅनर जाळले
3
'भारताच्या ऑपरेशन सिंदूरमुळे खूप नुकसान झाले', पाकिस्तानी नेत्या मरियम नवाजची कबुली
4
स्पाय कॅमेऱ्यातून बायकोचे प्रायव्हेट व्हिडिओ..! निलेश चव्हाणच्या काळ्या कारनाम्यांची A टू Z स्टोरी
5
शालार्थ आयडी घोटाळा : छत्रपती संभाजीनगर बोर्डाच्या सचिव वैशाली जामदार यांना अटक
6
नागपुरात वासनांधाने ओलांडली विकृतीची सीमा, घोड्यासोबत अनैसर्गिक कृत्य
7
'मला पाडण्यासाठी भाजपने प्रयत्न केले', धर्मरावबाबा आत्राम यांचा राष्ट्रवादीच्या मेळाव्यातच आरोप
8
“ते हत्यार शोधून…” वैष्णवी हगवणे प्रकरणात वकिलांकडून मोठी अपडेट
9
'...तर आयफोनवर 25 टक्के टॅरिफ लागेल', भारतातील आयफोन निर्मितीत ट्रम्प यांचा खोडा, टिम कुक यांना इशारा
10
नागपूर शहरातील सराफा आणि हवाला व्यावसायिकांवर ईडीचे छापे, लखोटियांना घेतलं ताब्यात
11
Vaishnavi Hagawane Death Case: वैष्णवी हगवणेचा सासरा आणि दीर दोघांना २८ मे पर्यंत पोलीस कोठडी
12
Virat Kohli: विश्वविक्रमापासून विराट कोहली फक्त ६३ धावा दूर; इतिहासात पहिल्यांदाच असं घडणार!
13
भयानक वादळ, पाकिस्तानने एअरस्पेस नाकारली, मग हवाई दलाने सांभाळला मोर्चा, वाचवले २२७ प्रवाशांचे प्राण 
14
छत्तीसगडच्या सीमेवर चार माओवाद्यांचा खात्मा गडचिराेली पाेलिसांची कारवाई, जंगलात काढली रात्र
15
'भारताने वॉटरबॉम्ब टाकला, आपण उपासमारीने मरू...', पाकिस्तानी खासदाराने व्यक्त केली भीती
16
पाकव्याप्त काश्मीरपेक्षा, पाकव्याप्त काँग्रेसचा धोका; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे टीकास्त्र
17
Pakistan Spy: दुसऱ्या पत्नीला भेटायला जायचा पाकिस्तानला, दिल्लीत भंगारचे काम; हेर मोहम्मद हारून कोण?
18
शेवटच्या क्षणी आरसीबीने कर्णधारच बदलला; नाणेफेकीसाठी आलेल्या खेळाडूला पाहून पॅट कमिन्स शॉक!
19
राहुल गांधींनी काँग्रेस नेत्यांना दिला असा कानमंत्र, आखली रणनीती, उत्तर देताना भाजपा नेत्यांची होणार पळापळ 
20
पत्नीला १७ वर्षांच्या मुलासोबत त्या अवस्थेत पाहिलं, पतीचं डोकं भडकलं, सिलेंडर उचलला आणि....

नगराध्यक्ष पदासाठी दोन भाऊंच्यात तह

By admin | Updated: July 27, 2016 01:07 IST

इस्लामपूर पालिका निवडणूक : आरक्षण पडल्यानंतरच मोर्चेबांधणी, अंतर्गत घडामोडींना वेग

अशोक पाटील --इस्लामपूर  --प्रभाग रचना आणि आरक्षणाचा निर्णय झाला तरीही, पक्षप्रतोद विजयभाऊ पाटील आणि माजी नगराध्यक्ष अ‍ॅड. चिमणभाऊ डांगे यांनी आपले प्रभाग निश्चित केलेले नाहीत. नगराध्यक्ष जनतेतून निवडून जाणार आहे. त्यामुळे नगराध्यक्षपद आरक्षण खुले पुरुष पडले, तर विजयभाऊ पाटील यांना डांगे यांचा पाठिंबा राहील आणि ओबीसी आरक्षण पडल्यास विजय पाटील चिमण डांगे यांना हिरवा कंदील दाखवतील, असा अंतर्गत तह दोन भाऊंच्यात झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळातून आहे.पावसाळी अधिवेशन झाल्यानंतर नगराध्यक्षपदाचे आरक्षण तारीख निश्चित होणार आहे. आॅगस्टच्या दुसऱ्या आठवड्यात आरक्षणाची सोडत होईल. त्यामुळे इस्लामपूर पालिकेच्या राजकारणात थोरले विजयभाऊ पाटील आणि धाकटे अ‍ॅड. चिमणभाऊ डांगे यांनी एकमेकांच्या विचाराने आगामी नगराध्यक्षपदाबाबत निर्णय घेण्याचे ठरवले आहे. प्रभाग रचना आणि आरक्षण निश्चित झाले आहे. पालिकेतील तिन्ही गटाच्या नेत्यांनी इच्छुक उमेदवारांची नावे जवळ जवळ निश्चित केली आहेत. परंतु नगराध्यक्षपद हे जनतेतून निवडून देण्याचा निर्णय झाल्याने इच्छुक असलेले पक्षप्रतोद विजयभाऊ पाटील, बी. ए. पाटील, अ‍ॅड. चिमण डांगे, आनंदराव मलगुंडे, संजय कोरे यांनी आजही आपले प्रभाग निश्चित केलेले नाहीत. तर विरोधी गटातून भाजपचे बाबासाहेब सूर्यवंशीही यांनी नगराध्यक्षपदासाठी आपली मोर्चेबांधणी सुरू केली आहे.राष्ट्रवादीची गेल्या ३० वर्षांची कारकीर्द पाहता नगराध्यक्षपद हे केवळ नामधारीच राहिले आहे. नगराध्यक्ष कोणी असला तरी, त्याच्यावर फक्त सह्याजीरावची भूमिका असते. त्यांना पक्षप्रतोद विजयभाऊ पाटील यांचा आदेश घेतल्याशिवाय कोणताही निर्णय घेता आलेला नाही. विजय पाटील यांना जो विरोध करेल, अशा नगराध्यक्षांना सभागृहात काम करू न देण्याच्या कारवाया पाटील यांचा गट नेहमीच करत आला आहे.अ‍ॅड. चिमण डांगे यांनी आपला नगराध्यक्षपदाचा कालावधी पूर्णपणे यशस्वी पार पाडला आहे. यामागचे खरे रहस्य म्हणजे त्यांचे थोरले बंधू म्हणून परिचित असलेले विजयभाऊ पाटील. त्यांच्या मार्गदर्शनाखालीच चिमण डांगे यांनी आपली कारकीर्द यशस्वी केली आहे. आजअखेर हे दोघे भाऊ एकमेकांच्या विचारानेच शहरातील राजकारण करत आहेत.आगामी पालिका निवडणुकीसाठीही हे दोघे भाऊ एकाच विचाराने मार्गक्रमण करत आहेत. नगराध्यक्ष पदासाठीही या दोघांमध्ये खलबते झाली असून, आरक्षण काय पडते, यावरच त्यांचा एकमेकांना पाठिंबा राहणार आहे. यदाकदाचित नगराध्यक्षपदासाठी खुले महिला आरक्षण पडल्यास या जागेवरच फक्त सौ. अरुणादेवी पाटील यांनाच संधी मिळणार आहे. याकडे आता लक्ष लागले आहे.कोण काय म्हणाले?आमच्या घरातील कोण उमेदवार असणार, याबाबत आजही निर्णय झालेला नाही. नगराध्यक्ष पदाचे काय आरक्षण पडेल, त्यावर प्रभागातील उमेदवार निश्चित होणार आहे. याचा निर्णय पक्षप्रतोद विजयभाऊ पाटीलच घेतील.- शहाजीबापू पाटील, नगरसेवक, इस्लामपूरमी ही निवडणूक लढविण्यास इच्छुक आहे. नगराध्यक्ष पदाचे ओबीसी आरक्षण पडल्यास माझे बंधू चिमण डांगे यांना उमेदवारी मिळेल. प्रभाग ९ मध्ये सध्या आमच्याच पार्टीचे बाळासाहेब पोरवाल यांच्या नावाची चर्चा आहे. त्यांनी निवडणूक लढवली नाही, तर आपण विचार करू.- विश्वास डांगे, माजी नगरसेवक, इस्लामपूर