शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

क्रांतिकारकांनी रेल्वे पाडल्याच्या घटनेला ७५ वर्षे पूर्ण चार जणांनी केली होती कामगिरी फत्ते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2018 23:34 IST

महात्मा गांधींनी ९ आॅगस्ट १९४२ ला ‘चले जाव’ची घोषणा केली आणि स्वातंत्र्यासाठी संपूर्ण देश पेटून उठला. ‘करेंगे या मरेंगे’ म्हणत गावोगावी आंदोलने सुरू झाली. सांगलीतही स्वातंत्र्यलढ्याचा ज्वर चढला होता.

ठळक मुद्देब्रिटिशांच्या जुलमी राजवटीविरोधात उसळला होता असंतोषबिसूर ओढ्याजवळील घटनेच्या आठवणी ताज्या...

शीतल पाटील ।सांगली : महात्मा गांधींनी ९ आॅगस्ट १९४२ ला ‘चले जाव’ची घोषणा केली आणि स्वातंत्र्यासाठी संपूर्ण देश पेटून उठला. ‘करेंगे या मरेंगे’ म्हणत गावोगावी आंदोलने सुरू झाली. सांगलीतही स्वातंत्र्यलढ्याचा ज्वर चढला होता. वसंतदादा पाटील यांनी १४ साथीदारांसह सांगलीचा तुरूंग फोडला. त्यानंतर वर्षभराने म्हणजे ७ सप्टेंबर १९४३ रोजी सांगलीच्या चार क्रांतिकारकांनी बिसूर ओढ्याजवळ मालगाडी पाडली. आज, शुक्रवारी या घटनेला ७५ वर्षे पूर्ण होत आहेत.

तत्कालीन सातारा जिल्हा स्वातंत्र्यलढ्यात अग्रेसर राहिला होता. तेव्हाच्या दक्षिण सातारा म्हणजे आताच्या सांगली जिल्ह्यातील क्रांतिसिंह नाना पाटील, वसंतदादा पाटील, नागनाथअण्णा नायकवडी, जी. डी. बापू लाड, आर. पी. पाटील, वि. स. पागे अशा हजारो क्रांतिकारकांनी या लढ्यात सहभाग घेतला. कधी तुरूंगवास, तर कधी भूमिगत राहून स्वातंत्र्याची ज्योत तेवत ठेवली होती. वसंतदादा पाटील यांनी सांगलीचा तुरूंग फोडला. दादा व त्यांच्या साथीदारांना पकडण्यासाठी इंग्रज पोलिसांनी गोळीबारही केला. त्यावेळी दोघेजण हुतात्मा झाले. या घटनेनंतर सांगलीत इंग्रजांच्या राजवटीविरोधात असंतोष आणखी वाढला. त्यात महात्मा गांधींनी ‘चले जाव’चा नारा दिल्याने स्वातंत्र्यसैनिक पेटून उठले. सरकारी यंत्रणा खिळखिळी करण्यासाठी प्रत्येकजण आपापल्यापरीने प्रयत्न करीत होते. दूरध्वनी यंत्रणेच्या तारा तोडून सरकारचा संपर्क तोडण्यात येत होता. चावड्या, सरकारी कार्यालये जाळली जात होती.

क्रांतिसिंह नाना पाटील यांनी पत्रीसरकारच्या माध्यमातून इंग्रजांवर दहशत निर्माण केली होती. मोर्चे, आंदोलने सुरूच होती. याच काळात सांगलीत रेल्वे पाडण्यासाठी पाच जणांची बैठक झाली. सध्याच्या कापडपेठेतील पवार ड्रेसेस या दुकानात नाना जोशी, गणपती पवार, देवाप्पा खोत, धोंडीरामबापू माळी, शामगौंडा पाटील या पाचजणांनी रेल्वे पाडण्याचा धाडसी निर्णय घेतला.मालगाडीचा चालक ठारसांगली-पुणे मार्गावरील बिसूर ओढ्याजवळ रेल्वेचा रूळ उखडण्याचे नियोजन करण्यात आले. पण त्यासाठी साहित्य कोठून आणायचे, असा प्रश्न होता. देवाप्पा खोत येथील गजानन मिलमध्ये कामाला होते. त्यांनी मिलमधून पाना आणण्याची जबाबदारी उचलली. ७ सप्टेंबर १९४३ रोजी धोंडीरामबापू माळी, गणपती पवार, देवाप्पा खोत, शामगोंडा पाटील बिसूर ओढ्याजवळ आले. त्यांनी रेल्वेचा रूळ उखडून टाकला. यावेळी प्रवासी रेल्वे एका स्टेशनवर थांबल्याने मालगाडी पुढे आली. बिसूर ओढ्याजवळ ही मालगाडी उलटली. यात मालगाडीचा चालक नंदपाल ठार झाला.दोघांना अटक, दोघे भूमिगतरेल्वे पाडल्याने इंग्रज पोलिसांनी या क्रांतिकारकांचा शोध सुरू केला. गणपती पवार यांच्या दुकानासमोर तीन दिवस पहारा ठेवला होता. पवार यांच्या दुकानात धोंडीरामबापू, शामगौंडा पाटील येत होते. तीन दिवसानंतर गणपती पवार व शामगौंडा पाटील या दोघांना पोलिसांनी अटक केली. पोलीस ठाण्यात त्यांचा अमानुष छळ करण्यात आला. धोंडीरामबापू माळी व देवाप्पा खोत भूमिगत झाले. माळी व खोत यांना पकडून देणाऱ्यास ब्रिटिश सरकारने ५ हजार रुपयांचे बक्षीसही जाहीर केले. पण हे दोघेही दोन वर्षे भूमिगत होते. त्यानंतर त्यांना मिरज येथे अटक करण्यात आली. आज या घटनेला ७५ वर्षे पूर्ण होत आहेत.

टॅग्स :Sangliसांगलीrailwayरेल्वे