शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
2
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
3
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
4
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
5
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
6
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
7
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
8
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
9
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
10
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
11
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
12
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
13
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
14
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
15
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
16
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
17
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
18
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
19
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
20
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार

रस्त्यांचे पॅचवर्क की, तिजोरीला लावला जातोय चुना; म्हैसाळ-नरवाड मार्गावरील चित्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2022 13:53 IST

‘लोकमत’ने म्हैसाळ-नरवाड रस्त्याच्या दुर्दशेचा पंचनामा केला होता. त्यानंतर खडबडून जागे झालेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाने खड्ड्यात मुरूम टाकून पॅचवर्क करण्याची नामी शक्कल लढवली, मात्र खड्ड्यात टाकलेला मुरूम व पॅचवर्क काही दिवसातच निघून गेल्याने पुन्हा मोठ-मोठे खड्डे पडले आहेत.

सुशांत घोरपडेम्हैसाळ : मिरज तालुक्यातील म्हैसाळ-नरवाड या रस्त्यावर पॅचवर्कच्या व देखभाल-दुरूस्तीच्या नावाखाली सार्वजनिक बांधकाम विभागाकडून लाखो रूपयांची उधळपट्टी केली जात आहे. पॅचवर्कच्या कामातून शासनाच्या तिजोरीलाच चुना लावण्याचा प्रकार होत असताना त्याचा वाहनधारकांना फटका बसत आहे.  ‘लोकमत’ने म्हैसाळ-नरवाड रस्त्याच्या दुर्दशेचा पंचनामा केला होता. त्यानंतर खडबडून जागे झालेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाने खड्ड्यात मुरूम टाकून पॅचवर्क करण्याची नामी शक्कल लढवली, मात्र खड्ड्यात टाकलेला मुरूम व पॅचवर्क काही दिवसातच निघून गेल्याने पुन्हा मोठ-मोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे पुन्हा पॅचवर्क सुरु झाले आहे.याबाबत बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना विचारणा केल्यानंतर ते म्हणाले, आता सुरू असणारे पॅचवर्क हे देखभाल-दुरूस्तीसाठीच्या तरतुदीतून सुरू असून त्याची निविदा १३ जून रोजी निघाली आहे. या दुरूस्तीसाठी ४५ लाख ८० हजार रूपयांचा निधी मंजूर आहे.म्हैसाळ-नरवाड रस्त्यावर महामार्गासाठी लागणाऱ्या मुरूमाची वाहतूक मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळे रस्ता पॅचवर्क करण्यास विलंब लागला आहे. अजूनही मुरूम वाहतूक सुरू असून आता वाट न बघता जिथे-जिथे मोठे खड्डे पडले आहेत. ते खड्डे पॅचवर्कने तर काही ठिकाणी खडी टाकून भरून घेतले जात आहेत.  या रस्त्यावर गेल्या वर्षभरात शेकडो अपघात झाले असून अनेक जणांना अपंगत्व आले आहे.

आमचे भाऊजी अमनहुल्ला शेख हे म्हैसाळ-नरवाड रस्तावरून प्रवास करत असताना दुचाकी खड्डात जाऊन पडले होते. यानंतर ते कोमामध्ये गेले. दीड महिना हॉस्पिटल मध्ये उपचार सुरू होते. जवळपास साडे पाच लाख रूपये खर्च आला आहे. -असिफ बुबनाळे, सामाजिक कार्यकर्ते, म्हैसाळ

 म्हैसाळ -नरवाड रस्त्यावर अनेक ठिकाणी मोठ-मोठे खड्डे पडले आहेत.त्यामुळे वारंवार लहान-मोठे अपघात होत आहेत. दुचाकी वरून पडून आठवड्यातून दोन-तीन रूग्ण दवाखान्यात येत आहेत. हा रस्ता होणे गरजेचे आहे. -डॉ.रामगोंड पाटील, ग्रामपंचायत सदस्य, नरवाड

टॅग्स :Sangliसांगली