शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

नीरा-लोणंद दुहेरीकरणासाठी ९ दिवस पॅसेंजर गाड्या रद्द, पुणे-सातारा रेल्वे मार्गावरील प्रवाशांची होणार गैरसोय 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2023 12:48 IST

मिरज : नीरा-लोणंद स्थानकादरम्यान ब्लॉक घेऊन रेल्वेमार्ग दुहेरीकरणासाठी विविध तांत्रिक कामे करण्यात येणार आहेत. यासाठी दि. १२ ते २१ ...

मिरज : नीरा-लोणंद स्थानकादरम्यान ब्लॉक घेऊन रेल्वेमार्ग दुहेरीकरणासाठी विविध तांत्रिक कामे करण्यात येणार आहेत. यासाठी दि. १२ ते २१ ऑक्टोबरदरम्यान काही रेल्वे गाड्या रद्द, काही गाड्यांचे मार्ग अंशतः रद्द व काही गाड्या विलंबाने धावणार आहेत. नवरात्र व दसऱ्याच्या काळात रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्याने प्रवाशांची गैरसोय होणार आहे.पुणे विभागात पुणे-सातारा रेल्वे मार्गावरील नीरा-लोणंद स्थानकादरम्यान ब्लॉक घेऊन रेल्वेमार्ग दुहेरीकरणासाठी विविध तांत्रिक कामांसाठी दि. १२ ते २१ दरम्यान काही पॅसेंजर व डेमू गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. पुणे-फलटण, लोणंद-फलटण व पुणे-सातारा या डेमू गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. दि.२१ व २२ ऑक्टोबर रोजी सुटणारी पुणे-कोल्हापूर एक्स्प्रेस कोल्हापूर ते सातारापर्यंतच धावेल. त्यामुळे ही गाडी पुणे-सातारा-पुणे अशी रद्द राहील.दि. २२ रोजी सुटणारी मुंबई-कोल्हापूर कोयना एक्स्प्रेस छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून नियमित वेळेऐवजी दोन तास उशिरा म्हणजेच सकाळी १० वाजून ४० मिनिटांनी सुटेल. तर कोल्हापूर-मुंबई कोयना एक्सप्रेस छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूर येथून नियमित प्रस्थानाऐवजी अडीच तास उशिरा म्हणजे सकाळी १० वाजून ४५ मिनिटांनी सुटेल.ब्लॉकमुळे १५ ते २० ऑक्टोबरदरम्यान सुटणारी कोल्हापूर-पुणे एक्स्प्रेसही विलंबाने धावेल. दि.२१ ऑक्टोबर रोजी चंदीगडहून सुटणारी चंदीगड यशवंतपूर एक्स्प्रेस पुणे ते सातारादरम्यान विलंबाने धावणार आहे.

टॅग्स :SangliसांगलीSatara areaसातारा परिसरPuneपुणेrailwayरेल्वे