शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगळुरूला धक्का, अहमदाबादमध्ये खेळवली जाणार IPL 2026 ची फायनल, प्लेऑफचं वेळापत्रक जाहीर
2
पाकिस्तानकडून आता दारू विकायला सुरुवात! ५० वर्षांपूर्वी 'हराम' म्हणून केलेली बॅन, पैसा कमवायच्या नादात...
3
सम्राट चौधरींचा मंत्रिमंडळ विस्तार 'पावसात वाहून गेला'; गांधी मैदानात चिखलाचे साम्राज्य
4
West Bengal Violence: हिंसेचा भडका! भाजपा आमदाराच्या भावाची हत्या, हिंसाचारात आतापर्यंत चौघांचा मृत्यू; जवानांवरही गोळीबार
5
"नुसतं नावाला 'घरचं मैदान', पिच बनवताना आम्हाला विचारत नाहीत.."; DC च्या कोचचा राग अनावर
6
इराकची जगाला मोठी 'ऑफर'! ११००० रुपयांचा कच्च्या तेलाचा बॅरल ३१०० रुपयांत देणार; अट फक्त एकच...
7
Top Marathi News LIVE: प. बंगालमध्ये निकालानंतर हिंसाचार थांबेना, जमावाने लेनिनचा पुतळा तोडला...
8
नशीब असावं तर थलापती विजयसारखं...! आधी TVK चा मोठा विजय अन् आता समोरून आली Good News
9
तामिळनाडूच्या राजकारणात मोठा ट्विस्ट; AIADMK चा TVK ला बाहेरून पाठिंबा देण्याचा निर्णय!
10
Punjab Blast: पंजाब हादरलं! ३ तासांत २ मोठे धमाके; अमृतसर आणि जालंधरमध्ये नेमकं काय घडलं? वाचा संपूर्ण टाइमलाईन
11
एका फुग्यावरून वाद अन् तरुणाचा बळी! उत्तम नगर मर्डर केसमध्ये धक्कादायक खुलासे
12
लोन फेडलं नाही तर बँक जप्त करू शकते तुमची प्रॉपर्टी; RBI नं जारी केले नवे ड्राफ्ट नियम
13
पश्चिम बंगालचा निकाल येताच अखिलेश यादव यांचा मोठा निर्णय; समाजवादी पार्टीने IPAC सोबतची डील केली रद्द
14
DC vs CSK : वाऱ्यानं बेल्स पडल्या, मग Nitish Rana आउट कसा? डेड बॉल का नाही? नियम काय सांगतो?
15
दिवाळखोर होण्याचं संकट टळलं! कंपनीला क्लिन चीट, शेअरला २०%चं अपर सर्किट; ३० दिवसांत ३३% ची वाढ
16
Numerology: अंकशास्त्रानुसार 'या' ४ मुलांकांच्या स्त्रिया साक्षात लक्ष्मीचं रूप; घरात आणतात अपार सुख-समृद्धी
17
विजय यांच्या टीव्हीकेला पाठिंबा द्या, अन्यथा..., ३० आमदारांचा इशारा, तामिळनाडूत अण्णा द्रमुक फुटीच्या उंबरठ्यावर?
18
मुंबई विमानतळावर ७ मे रोजी ६ तासांचा 'ब्लॉक'; धावपट्टीच्या देखभालीसाठी विमान सेवा राहणार बंद
19
Sanju Samson: संजू सॅमसन सुसाट! डेव्हिड वॉर्नरचा रेकॉर्ड मोडला, एबी डिव्हिलियर्सचा विक्रम धोक्यात
20
अजबच! एकाच आईच्या जुळ्या मुली, पण दोघींचेही वडील वेगवेगळे; DNA रिपोर्टमधून खळबळजनक खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

जतमध्ये कागदोपत्रीच पंचनामे

By admin | Updated: April 27, 2015 00:15 IST

प्रशासनाचा अजब कारभार : ४२३९ शेतकऱ्यांना अवकाळीचा फटका

संख : मार्चमध्ये झालेल्या अवकाळी पावसाने जत तालुक्यातील ४ हजार २३९ शेतकऱ्यांना फटका बसला आहे. खरिपाच्या पिकासह द्राक्ष, डाळिंब फळबागांचे नुकसान झाले. अवकाळीचा सर्वाधिक फटका बेदाणा उत्पादक, फळबागायतदारांना बसला आहे. द्राक्ष बागांचेही नुकसान झाले होते. परंतु प्रशासनाने जागेवर न जाता वस्तुनिष्ठ पंचनामे केलेले नाहीत. ५० टक्केपेक्षा कमी नुकसान दाखविण्यात आले आहे. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकरी शासनाच्या मदतीपासून वंचित राहणार आहेत.अवकाळी पावसाने तालुक्यामध्ये १० कोटींहून अधिक रुपयांचे नुकसान झाले आहे. परंतु प्रशासनाने कमी नुकसानीचा प्रस्ताव तयार केला आहे. त्यानुसार १ कोटी ५० लाख ८० हजार मदतीचा प्रस्ताव शासन दरबारी पाठविला आहे. या प्रस्तावानुसार शेतकऱ्यांना तुटपुंजीच मदत मिळणार आहे.रब्बी हंगामातील पिकांची उगवण चांगली झाली होती. शिवारभर पिके बहरली होती. चांगल्या उत्पादनाची आशा शेतकरी बाळगून होता. परंतु अवकाळी पावसामुळे ज्वारी, गहू, हरभरा पिकांचे मोठे नुकसान झाले. ऐन हंगामातच पावसाने हजेरी लावल्याने द्राक्षांना तडे गेले. निर्यातक्षम द्राक्षांचे मोठे नुकसान झाले. रॅकवर टाकलेला बेदाणा भिजला. बेदाणा काळा पडला. परिणामी उतारा कमी निघाला.जिल्हा प्रशासनाने कृषी सहाय्यक तलाठी आणि ग्रामसेवकांना संयुक्तपणे शेतीच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले होते. परंतु पंचनामे वस्तुनिष्ठपणे केलेले नाहीत. जास्त नुकसान होऊनही ५० टक्केपेक्षा कमी नुकसान दाखविण्यात आले आहे. पंचनाम्यानुसार ४ हजार २३९ शेतकऱ्यांचे २ हजार १७३.५० हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. त्यामध्ये ज्वारीचे १ हजार ८५६ हेक्टर, हरभरा १६३.३५ हेक्टर, गहू ११८.८७ हेक्टर, द्राक्षे ०० हेक्टर, बेदाणा ९८५.५० टनाचे नुकसान झाल्याचे नमूद आहे. शासनाकडे १ कोटी ५ लाख ८० हजार रुपये मदतीचा प्रस्ताव देण्यात आला आहे. परंतु प्रत्यक्षात पिकांचे, द्राक्षे, बेदाणा, डाळिंबाचे नुकसान जादा झाले आहे. (वार्ताहर)अवकाळीचे पंचनामे चुकीचे केलेले आहेत. त्यामुळे बाधित क्षेत्र कमी झाले आहे. युती शासनाने शेतकऱ्यांना नुकसान मदतीची रक्कम वाढवावी. पंचनामे वस्तुनिष्ठ करण्याची आमची मागणी आहे.- चंद्रशेखर रेबगोंडपूर्व विभाग अध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना