सांगली : जिद्द, चिकाटी आणि सातत्यपूर्ण अभ्यासाच्या जोरावर हिवतड (ता. आटपाडी) येथील पल्लवी संपतराव पाटील हिने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) राज्यसेवा परीक्षेत राज्यात आठवा क्रमांक पटकावून सांगली जिल्ह्याचा नावलौकिक वाढविला आहे. या यशामुळे तिची राज्य शासनाच्या कृषी उपसंचालकपदावर निवड झाली असून, ग्रामीण भागातील तरुण-तरुणींना तिच्या यशाने नवी प्रेरणा मिळाली आहे.दुष्काळी परिस्थिती, मर्यादित साधने आणि ग्रामीण वास्तवाशी सामना करत पल्लवीने अभ्यासात कधीही खंड पडू दिला नाही. नियोजनबद्ध तयारी, विषयांची सखोल समज, सातत्यपूर्ण सराव आणि आत्मविश्वास या चार सूत्रांवर तिने यशाची शिडी चढली. विशेष म्हणजे, कृषी क्षेत्राशी संबंधित विषयांवरची तिची पकड आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांविषयीची संवेदनशीलता या यशामागे निर्णायक ठरली.पल्लवीच्या या उज्ज्वल कामगिरीबद्दल हिवतड गावात आनंदाचे वातावरण असून कुटुंबीय, शिक्षक, मित्रपरिवार आणि ग्रामस्थांकडून तिचा सत्कार केला. ‘शेतकऱ्यांच्या हितासाठी काम करण्याची संधी मिळावी, हेच माझे ध्येय आहे,’ अशी भावना पल्लवीने व्यक्त केली.
Web Summary : Pallavi Patil from Hivtad, Sangli, achieved state rank eight in the MPSC exam. Overcoming adversity with dedication, she secured a position as Deputy Director of Agriculture, inspiring rural youth. Her success is attributed to focused study and understanding of agricultural issues.
Web Summary : सांगली की हिवतड की पल्लवी पाटिल ने एमपीएससी परीक्षा में राज्य में आठवां स्थान प्राप्त किया। कठिनाइयों को पार करते हुए, उन्होंने कृषि उप निदेशक के पद पर जगह बनाई, जिससे ग्रामीण युवाओं को प्रेरणा मिली। उनकी सफलता का श्रेय केंद्रित अध्ययन और कृषि मुद्दों की समझ को जाता है।