शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

एलबीटीप्रश्नी कारवाई थांबविण्याचे आदेश

By admin | Updated: November 16, 2014 00:11 IST

व्यापाऱ्यांची माहिती : महापालिकेकडून आदेशाबाबत इन्कार

सांगली : महापालिकेने सुरू केलेली एलबीटीविरोधातील कारवाई थांबवावी, असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दूरध्वनीद्वारे दिल्याची माहिती आज एलबीटीविरोधी कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी दिली. दुसरीकडे महापालिका जनसंपर्क अधिकाऱ्यांनी असा कोणताही आदेश महापालिकेला प्राप्त झाला नसल्याचे सांगितले आहे. सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिका क्षेत्रातील व्यापाऱ्यांनी गेल्या अनेक दिवसांपासून एलबीटी (स्थानिक संस्था कर) भरण्यावर बहिष्कार टाकला आहे. दुसरीकडे महापालिका प्रशासनाने अशा व्यापाऱ्यांवर कारवाईची मोहीम उघडली आहे. त्यामुळे व्यापारी व महापालिकेतील संघर्ष आता टोकाला गेला आहे. एलबीटीचा प्रश्न सुटेपर्यंत महापालिकेने कारवाई थांबवावी, अशी मागणी कृती समितीने अनेकदा केली होती. महापालिकेने त्यांची ही मागणी धुडकावून लावली होती. त्यानंतर राज्यातील व्यापाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांनाही तशा आशयाचे पत्र दिले होते. आज यासंदर्भात फडणवीस यांनी आदेश दिल्याचे व्यापाऱ्यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे सांगितले. पत्रकात म्हटले आहे की, येत्या दोन दिवसांत कर न भरणाऱ्या व्यापाऱ्यांवर फौजदारी कारवाई करण्याची तयारी महापालिकेने केल्याची माहिती व्यापाऱ्यांना मिळाली होती. त्यामुळे याबाबतची माहिती आ. सुधीर गाडगीळ यांना देण्यात आली. गाडगीळ यांनी मुख्यमंत्र्यांशी याबाबत दूरध्वनीवरून चर्चा केली. कारवाई थांबविण्याबाबत महापालिकेला सूचना देण्याची मागणी त्यांनी केली. त्यानंतर फडणवीस यांनी दूरध्वनीवरूनच आयुक्त अजिज कारचे यांच्याशी संपर्क साधून कारवाई न करण्याबाबतचे आदेश दिले. गाडगीळ यांनीही व्यापाऱ्यांना एलबीटीसंदर्भात कारवाई होऊ न देण्याचे आश्वासन दिले. भाजपने एलबीटी रद्द करण्याबाबत लेखी आश्वासन यापूर्वीच दिले असल्याने लवकरच याबाबतचा निर्णय मुख्यमंत्री घेतील, असेही गाडगीळ यांनी व्यापाऱ्यांना सांगितले. एलबीटीविरोधी कृती समितीने याबाबत लवकरच मेळावा घेण्याचा निर्णय घेतला आहे. अशी माहिती समीर शहा, विराज कोकणे यांनी दिली.