शहरं
Join us  
Trending Stories
1
“उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांसोबत केले, तेच आदित्य करताहेत”; शिंदेंच्या नेत्यांनी इतिहास काढला
2
LPG Gas Cylinder Booking Rules : गॅस सिलिंडर बुकिंगशी संबंधित २ नवीन अपडेट्स, एलपीजी पुरवठ्याबाबत सरकारने काय सांगितले? जाणून घ्या
3
Latest Marathi News LIVE Updates: भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली
4
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
5
Savita Pradhan : "नवरा छळायचा, बादलीत लघवी करुन अंगावर फेकली", IAS सविता प्रधान सांगतात असह्य छळ
6
"तर महाराष्ट्राला मोठी किंमत चुकवावी लागेल"; विजय वडेट्टीवार यांचा महायुतीला सूचक इशारा
7
'या' दिग्गज टेक कंपनीकडून भारतीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट: ५ लाखांपासून १ कोटीपर्यंत मिळणार बोनस
8
आता प्रवासावेळी टायर फाटलं तरी टेन्शन नाही...! या नव्या SUV ची जोरदार चर्चा; फीचर्सही भन्नाट
9
Home Decoration: मातीची गरज नाही, फक्त हवी काचेची बरणी आणि रोपटं! 'वॉटर गार्डनिंग'ने बदला घराचा लूक
10
छ. संभाजीनगर, वाठार, पेठवडगाव, जयसिंगपूर ४ बस स्थानकांचे उद्घाटन; प्रताप सरनाईकांचा दौरा
11
पाकिस्तान कोणता खेळ खेळतंय? इराण युद्ध काळात तुर्की, सौदी अन् कतारला चाललेत PM शहबाज शरीफ
12
'देखणी नवरी मिळेल' सांगितलं अन् ७ हजार जणांना लुटलं; लोकांना फसवणाऱ्या मॅट्रिमोनियल साईटचा असा झाला गेम!
13
अमरावतीत 'योगी स्टाईल' कारवाई! अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
14
होर्मुझनंतर आता 'मलक्का'वर अमेरिकेची नजर; ट्रम्प यांची नवी खेळी! भारतासाठी ठरणार गेमचेंजर?
15
“सुनेत्रा काकींना ९९% मतदान होईल, अजितदादांना स्मरून मतदान करा”; रोहित पवार प्रचाराला लागले
16
आदित्य ठाकरे आता उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होणार?; संजय राऊतांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
17
कोविड लसींच्या सक्तीमुळे शेन वॉर्नचा मृत्यू, मुलाचा खळबळजनक दावा
18
Vastu Tips: घरात ठेवलेली रोपं केवळ शोभेची वस्तू नाहीत, ती निर्माण करतात 'लाईव्ह एनर्जी'; वाचा वास्तू रहस्य
19
चीनला इराणकडून तेल खरेदी करू देणार नाही; ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाने दिली मोठी धमकी
20
मोबाईल दुकानदार होता टार्गेट, बळी गेला व्यापाऱ्याचा; कोल्हापुरात खंडणीसाठी बॅटरीचा शॉक देऊन हत्या
Daily Top 2Weekly Top 5

जयंतरावांविरोधात विरोधक एकवटले

By admin | Updated: July 16, 2015 00:10 IST

सर्वपक्षीय आव्हान : इस्लामपूर कृषी बाजार समितीची निवडणूक रंगणार

अशोक पाटील- इस्लामपूर शहरासह कृषी उत्पन्न बाजार समितीवर वर्चस्व असलेल्या माजी मंत्री जयंत पाटील यांच्याविरोधात लढण्यासाठी सर्वपक्षीय विरोधक एकवटले आहेत. त्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीला चांगलाच रंग चढणार आहे.इस्लामपूर मतदारसंघावर राष्ट्रवादीचे आमदार जयंत पाटील, माजी आमदार विलासराव शिंदे यांचे वर्चस्व आहे. सहकारी क्षेत्रातील सर्वच निवडणुका बिनविरोध होत असताना कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत राष्ट्रवादीपुढे सर्वपक्षीय नेत्यांनी आव्हान उभे केले आहे. यासाठी सर्व मतभेद बाजूला सारुन विरोधक एकवटले आहेत.कृषी उत्पन्न बाजार समितीवर जाण्यासाठी राष्ट्रवादीमध्ये मोठी रस्सीखेच होती. काहींना तिकीट न मिळाल्याने त्यांच्यातून नाराजी व्यक्त होत आहे, तर विरोधी गटाने शेतकरी पॅनेलच्या माध्यमातून राष्ट्रवादीपुढे आव्हान उभे केले आहे. हे आव्हान पेलण्यासाठी शेतकरी पॅनेलला तारेवरची कसरत करावी लागणार आहे.शेतकरी पॅनेलची स्थापना करण्यामध्ये काँग्रेसचे सी. बी. पाटील, नानासाहेब महाडिक, वैभव नायकवडी, अभिजित पाटील, वैभव पवार, शिवसेनेचे आनंदराव पवार, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांच्यासह शिराळ्याचे आमदार शिवाजीराव नाईक यांचा समावेश आहे. त्यांचे समर्थक राष्ट्रवादीच्या उमेदवारांविरोधात निवडणुकीत लढणार आहेत.गत निवडणुकीप्रमाणेच यावेळची निवडणूक बिनविरोध होणार, अशीच हवा पहिल्या टप्प्यात होती. परंतु राष्ट्रवादीमध्ये इच्छुकांची संख्या वाढल्याने आमदार जयंत पाटील यांनीही बिनविरोधसाठी हालचाल केली नाही. तसेच विरोधकांकडूही बिनविरोधचा प्रस्ताव आला नाही. त्यामुळे राष्ट्रवादीविरोधात नेमका कोणता पक्ष आव्हान देणार, असा प्रश्न होता. अखेरच्या टप्प्यात सर्वपक्षीय विरोधकांनी एकत्र येत शेतकरी पॅनेलच्या माध्यमातून एकास एक उमेदवार देण्यावर शिक्कामोर्तब केले आहे.आमदार जयंत पाटील यांच्या गटाला हादरा देण्यासाठी आम्ही सर्वपक्षीय नेते एकत्र आलो आहोत. राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून ज्यांना उमेदवारी मिळाली नाही असे अनेकजण नाराज आहेत, तेही आमच्यासोबत येणार आहेत. त्यामुळे निवडणुकीत आम्ही राष्ट्रवादीला चांगले आव्हान देणार आहोत.- सी. बी. पाटील, संचालक, जिल्हा बॅँक