सांगलीत प्रेमसंबंधाच्या संशयावरुन एकावर तलवारीने वार
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2022 16:25 IST2022-07-20T16:24:37+5:302022-07-20T16:25:10+5:30
पत्नीशी प्रेमसंबंध असल्याचा संशय

सांगलीत प्रेमसंबंधाच्या संशयावरुन एकावर तलवारीने वार
सांगली : शहरातील जुना बुधगाव रोडवरील वाल्मिकी आवासमध्ये प्रेमसंबंधाच्या संशयावरुन एकास तलवारीने व लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन जखमी करण्यात आले. याप्रकरणी आशिष शेखर शिंदे (रा. बिल्डिंग क्रमांक २१, वाल्मिकी आवास, सांगली) यांनी संतोष जाधव (रा. वाल्मिकी आवास, सांगली) याच्याविरोधात सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, रविवार दि. १७ रोजी रात्री अकराच्या सुमारास हा प्रकार घडला. फिर्यादी शिंदे हे गवंडी काम करतात. शिंदे व संशयित दोघेही वाल्मिकी आवासमध्ये राहण्यास आहेत. फिर्यादी शिंदे यांचे आपल्या पत्नीशी प्रेमसंबंध असल्याचा संशय संतोष यास होता. यातूनच फिर्यादी कुटुंबीयांसमवेत जेवण करत असताना, संशयिताने तलवारीने त्यांच्या मानेवर व डाव्या बाजुला वार केले तर लाथाबुक्क्यांनी मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.