इस्लामपुरात कव्वाली कार्यक्रमात एकाचा हवेत गोळीबार, राष्ट्रवादीच्या माजी नगरसेवकाकडे रोख; व्हिडीओ व्हायरल
By श्रीनिवास नागे | Updated: October 14, 2022 13:08 IST2022-10-14T13:02:03+5:302022-10-14T13:08:45+5:30
या घटनेचा व्हिडीओ आज, शुक्रवारी व्हायरल झाल्यानंतर या गोळीबाराची शहरात मोठी चर्चा होत आहे.

इस्लामपुरात कव्वाली कार्यक्रमात एकाचा हवेत गोळीबार, राष्ट्रवादीच्या माजी नगरसेवकाकडे रोख; व्हिडीओ व्हायरल
सांगली : इस्लामपूर शहरातील मोमीन मोहल्ला परिसरात सोमवारी (दि.१०) रात्री राष्ट्रवादीच्या एका माजी नगरसेवकाने आयोजित केलेल्या कव्वालीच्या कार्यक्रमात हवेत गोळीबार केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेचा व्हिडीओ आज, शुक्रवारी व्हायरल झाल्यानंतर या गोळीबाराची शहरात मोठी चर्चा होत आहे.
ईद ए मिलादुनबीनिमित्त येथील राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक पीरअली पुणेकर विश्वस्त असलेल्या ख्वाजा गरीब नवाज सोशल वेल्फेअर ट्रस्टच्यावतीने सोमवारी रात्री कव्वालीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष, माजी मंत्री आमदार जयंत पाटील यांच्यासह राष्ट्रवादीच्या अनेक पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
त्यानंतर काही वेळाने कार्यक्रम सुरू असतानाच रंगमंचावर बसलेल्या एकाने बाजूला जात आपल्याकडील पिस्तुलातून हवेत काही फैरी झाडल्या. त्यानंतर तो पुन्हा व्यासपीठावर येऊन बसला. सोमवारी रात्री झालेल्या या गोळीबाराचा व्हिडीओ आज (शुक्रवारी) सकाळपासून व्हायरल झाल्यानंतर शहरात खळबळ उडाली होती. स्थानिक पोलिसांशी या घटनेबाबत विचारणा करण्यासाठी संपर्क साधल्यावर त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही.
इस्लामपुरात कव्वाली कार्यक्रमात एकाचा हवेत गोळीबार, राष्ट्रवादीच्या माजी नगरसेवकाकडे रोख; व्हिडीओ व्हायरल.#NCPpic.twitter.com/mK5gXF68Tu
— Lokmat (@lokmat) October 14, 2022