शहरं
Join us  
Trending Stories
1
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
2
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
3
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
4
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
5
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
6
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
7
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
8
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
9
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
10
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
11
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
12
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
13
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
14
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
15
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
16
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
17
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
18
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
19
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
20
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

सांगली महापालिकेतील पहिल्याच दिवशी महापौर ॲक्शन मोडवर, विभागनिहाय घेतला आढावा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2026 17:46 IST

शुक्रवारपासून थेट विभागातच बैठका

सांगली : महापौरपदाचा पदभार स्वीकारताच धीरज सूर्यवंशी यांनी कामकाजाला वेग देण्याचे संकेत दिले. पहिल्याच दिवशी आढावा बैठक घेत नागरिकांच्या हिताच्या कामाला प्राथमिकता देण्याची सूचना प्रशासनाला केली, तसेच शुक्रवारपासून विभागनिहाय स्वतंत्र बैठक घेऊन प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्याचा इरादाही स्पष्ट केला.महापालिकेच्या कै. राजाभाऊ जगदाळे सभागृहात झालेल्या या बैठकीला उपमहापौर गजानन मगदूम, सभागृह नेते संदीप आवटी, अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे, उपायुक्त अश्विनी पाटील, स्मृती पाटील, शहर अभियंता पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह सर्व खातेप्रमुख उपस्थित होते.बैठकीच्या प्रारंभी अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे यांनी नूतन महापौर, उपमहापौर व सभागृह नेत्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यानंतर सर्व खातेप्रमुखांनी आपल्या विभागाच्या कामकाजाची सविस्तर माहिती सादर केली. यावेळी महापौर सूर्यवंशी यांनी पाणी, ड्रेनेज, घरपट्टी, पाणीपट्टी, आरोग्य, मालमत्ता विभागाचा आढावा घेतला. नागरिकांना मुबलक पाणी देण्यासाठी काय उपाययोजना कराव्या लागतील, याचा अहवाल तयार करण्याची सूचना केली. याबाबत दोन दिवसांत पाणीपुरवठा विभागाची स्वतंत्र बैठक घेऊन त्यांचा अडचणीही जाणून घेतल्या जातील, असेही महापौरांनी सांगितले.

महापालिकेचे जे प्रस्ताव राज्य शासनाकडे प्रलंबित आहेत, ते संबंधित मंत्र्यांच्या माध्यमातून मार्गी लावण्यासाठी पदाधिकाऱ्यांनी विशेष प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले. प्रत्येक विभागाचे प्रश्न मुळापासून सोडवण्यासाठी आगामी ५-६ दिवसांत स्वतंत्र बैठकांचे नियोजन केले आहे. शुक्रवारपासून घरपट्टी आणि स्वच्छता विभागाच्या विशेष बैठका घेऊन धोरणात्मक निर्णय घेतले जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले.अतिरिक्त आयुक्त रोकडे यांनी आकृतिबंध आणि रिक्त पदांच्या परिस्थितीबाबत माहिती दिली. उपायुक्त स्मृती पाटील यांनी सूचनांचे काटेकोर पालन करून निश्चित केलेली उद्दिष्टे पूर्ण करण्याची ग्वाही दिली.पालकमंत्र्याकडून सूचनामहापौर धीरज सूर्यवंशी, उपमहापौर गजानन मगदूम, सभागृह नेते संदीप आवटी यांनी सकाळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची भेट घेतली. यावेळी पालकमंत्र्यांनी स्वच्छ व पारदर्शी कारभारासोबतच जनतेच्या हिताला प्राथमिकता देण्याचे निर्देश दिले. महापालिका क्षेत्रातील प्रलंबित प्रश्नांबाबत लवकरच मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर नूतन पदाधिकाऱ्यांनी दिवसभरात जिल्हा नियोजन समितीसह विविध बैठकांना हजेरी लावली.

English
हिंदी सारांश
Web Title : Sangli Mayor Takes Charge, Prioritizes Public Welfare Immediately

Web Summary : New Sangli Mayor Dheeraj Suryavanshi initiated immediate action, reviewing departmental work and prioritizing citizen-centric projects. He scheduled meetings to resolve pending issues and address water, drainage, and property tax concerns. He also sought state government intervention for pending proposals after meeting with the Guardian Minister.
टॅग्स :Sangli Miraj Kupwad Municipal Corporation Electionसांगली मिरज कुपवड महानगरपालिका निवडणूक निकाल २०२६SangliसांगलीMayorमहापौर