शहरं
Join us  
Trending Stories
1
अरबी समुद्रात पाकिस्तान करणार होता कुरापती; माहिती मिळताच २४ तासांत भारताने उतरवली युद्धनौका
2
कैसे बोगस दाखला बनाया? एमआयएम नगरसेविका सहर शेखकडून शासकीय यंत्रणांची दिशाभूल
3
नाशिकच्या तरुणींना मलेशियात विकण्याचा कट? आयटी कंपनीतील 'त्या' प्रकरणाला मानवी तस्करीचे भयानक वळण
4
Mumbai Traffic Update: बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
5
आज सोन्या-चांदीच्या किमतीत किती झाला बदल? ऑल टाईम हायवरुन Silver १,६४,८४४ रुपयांनी खाली; सोन्याची किंमत किती?
6
IPL 2026: आधीच KKRची एक सामना जिंकायची मारामार, त्यात अजिंक्य रहाणेला BCCIचा मोठा दणका
7
सुपर डुपर हिट... ‘वंदे भारत’ची कमाल कामगिरी, ९ कोटी प्रवाशांचा प्रवास; २७४ जिल्हे, १६४ सेवा!
8
जुलैपासून पुन्हा वाढणार जगाचं टेन्शन! भारतावरही होणार परिणाम, अमेरिकेनं स्पष्ट शब्दांत दिले संकेत
9
Share Market: शेअर बाजारात तुफान तेजी! सेंसेक्समध्ये १२०० अंकांची उसळी; निफ्टी २४,२०० च्या वर; 'या' शेअर्समध्ये जोरदार रॅली
10
२१ तास चर्चा करूनही अमेरिका-इराणमध्ये करार का झाला नाही? व्हान्स यांनी सांगितली Inside Story
11
शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशांवर पीक विमा कंपन्या मालामाल, नऊ वर्षांत कमावले ७३,६३० काेटी
12
विकसित भारतासाठी प्रगती, निसर्ग आणि संस्कृतीचा त्रिवेणी संगम आवश्यक: पंतप्रधान नरेंद्र मोदी
13
भन्साळींच्या 'रोमँटिक' प्रोजेक्टसाठी शाहरुखचा 'ग्रीन सिग्नल'? वयानुसार भूमिका करणार किंग खान
14
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
15
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
16
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
17
दादर-रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा दादरवरून धावणार? व्यवहार्यता अहवालावरच पुढील निर्णय अवलंबून
18
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
19
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
20
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
Daily Top 2Weekly Top 5

वृद्धेचा होरपळून मृत्यू

By admin | Updated: November 12, 2014 23:29 IST

कासेगावातील घटना : शॉर्टसर्किटने आग लागल्याचा अंदाज

कासेगाव : कासेगाव (ता. वाळवा) येथे शॉर्टसर्किट होऊन घराला लागलेल्या भीषण आगीत श्रीमती पुष्पा अशोक कुलकर्णी (वय ७०) ही वृद्धा होरपळून जागेवरच मृत झाली. आज, बुधवारी सकाळी ही दुर्घटना घडली.येथील ग्रामपंचायतीजवळ कुलकर्णी कुटुंबियांचे जुने घर असून, ते ‘बामणाचा वाडा’ म्हणून प्रचलित आहे. वाड्यातील वरील बाजूच्या एका खोलीमध्ये पुष्पा कुलकर्णी राहात होत्या. त्यांच्या पतीचे सहा महिन्यांपूर्वी निधन झाले असून, त्यांना अपत्य नाही. वाड्यातील दुसऱ्या भागात पुष्पा यांचे दीर, जाऊ, पुतणे स्वतंत्र राहतात. आज सकाळी पुष्पा एकट्याच घरामध्ये झोपल्या होत्या. त्यावेळी त्यांच्या खोलीला आतून कुलूप होते.सकाळी दहाच्या सुमारास शॉर्टसर्किट होऊन घराला आग लागली. संपूर्ण घराचे बांधकाम लाकडी असल्याने क्षणातच आगीने रौद्ररूप धारण केले. लोकांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला, परंतु आग आटोक्यात येत नव्हती. त्यानंतर कृष्णा कारखाना आणि इस्लामपूर नगरपालिकेच्या अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले. वाडा जळत असताना पुष्पा यांचा ‘वाचवा, वाचवा’ असा आक्रोश येत होता, परंतु आगीने रौद्ररूप धारण केल्याने कोणालाही पुढे जाता येत नव्हते. त्यातच पुष्पा यांच्या खोलीला आतून कुलूप असल्याने कोणालाही आत जाता आले नाही. त्यांचा भाजून जागीच मृत्यू झाला. (प्रतिनिधी)नेमके कारण काय?कुलकर्णी कुटुंब आर्थिकदृष्ट्या सक्षम असून, त्यांची मोठ्या प्रमाणावर शेतजमीन आहे. पुष्पा यांच्या पतीचे सहा महिन्यांपूर्वीच निधन झाल्याने व त्यांच्यामागे अपत्य नसल्याने या घटनेमागे नेमके काय, याबाबत चर्चा सुरू आहे. ही घटना शॉर्टसर्किट आहे की, आत्महत्या की, घातपात, याबाबत उलटसुलट चर्चा सुरू आहे.