नियमांचे पालन हेच कोरोनापासून संरक्षण कवच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2021 04:23 IST2021-04-12T04:23:30+5:302021-04-12T04:23:30+5:30

कामेरी : शासकीय यंत्रणा व तज्ज्ञ डाॅक्टर्सनी सांगितलेले नियम पाळावेत. सोशल डिस्टन्सिंग व मास्कचा वापर करणे हीच कोविडपासून ...

Obeying the rules is the shield against corona | नियमांचे पालन हेच कोरोनापासून संरक्षण कवच

नियमांचे पालन हेच कोरोनापासून संरक्षण कवच

कामेरी : शासकीय यंत्रणा व तज्ज्ञ डाॅक्टर्सनी सांगितलेले नियम पाळावेत. सोशल डिस्टन्सिंग व मास्कचा वापर करणे हीच कोविडपासून वाचण्याची कवचकुंडले ठरतील, असे मत केंद्रीय आरोग्य नियंत्रण संस्थेच्या कोविड पाहणी पथकाचे सहसंचालक डाॅ. प्रणवकुमार वर्मा यांनी व्यक्त केले.

तुजारपूर (ता. वाळवा) येथे गावभेटीवेळी ते बोलत होते. वर्मा यांच्या नेतृत्वाखाली सांगली जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पथक वाळवा तालुक्यात आले होते. यावेळी त्यांच्यासोबत जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अजय साळुंखे, सांगली सिव्हिल सर्जन डॉ. मिलिंद पोरे, डॉ. नामदेव पवार, डाॅ. संतोष पाटील, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. साकेत पाटील, सरपंच अस्मिता पाटील, पोलीस पाटील वसंत पाटील आरोग्य अधिकारी डाॅ. सुरेखा कदम उपस्थित होते.

कामेरी येथील कर्मवीर शिक्षण संस्था, सावित्री महिला मंडळ व भैरवदेव पतसंस्था यांच्या वतीने प्रा. अनिल पाटील व सुनील पाटील यांनी गतवर्षीप्रमाणे यंदाही कोरोना रुग्णांसाठी गरज भासल्यास ऑक्सिजन सिलिंडर व ऑक्सिजन मशीन पुरवण्याची व्यवस्था करू असे सांगितले. कोविडचा प्रभाव रोखण्यासाठी देण्यात येणारे १००० मास्क डॉ. प्रणवकुमार वर्मा यांच्या हस्ते पोलीस पाटील वसंतराव पाटील, सरपंच अस्मिता पाटील, माणिक पाटील यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले.

फोटो ओळी : तुजारपूर (ता. वाळवा) येथे केंद्रीय आरोग्य सहसंचालक डाॅ. प्रणवकुमार वर्मा यांनी भेट दिली. यावेळी डॉ. संजय साळुंखे, डॉ. मिलिंद पोरे, डॉ. नामदेव पवार, डाॅ. संतोष पाटील, डॉ. साकेत पाटील, अस्मिता पाटील, वसंत पाटील, सुरेखा कदम, प्रा. अनिल पाटील, सुनील पाटील उपस्थित होते.

Web Title: Obeying the rules is the shield against corona