शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
2
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
3
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
4
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
5
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
6
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
7
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
8
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
9
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
10
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
11
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
12
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
13
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
14
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
15
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
16
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
17
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
18
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
19
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
20
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
Daily Top 2Weekly Top 5

आधार कार्डावर पूर्ण जन्मतारीख नाही ? मग कोरोनाची लस मिळणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2021 04:24 IST

सांगली : तुमचे आधार ओळखपत्र अपडेटेड नसल्यास कोरोनाची लस मिळणार नाही. होय, हे खरे आहे. लसीकरणाच्या नोंदीसाठी कोविन २.० ...

सांगली : तुमचे आधार ओळखपत्र अपडेटेड नसल्यास कोरोनाची लस मिळणार नाही. होय, हे खरे आहे. लसीकरणाच्या नोंदीसाठी कोविन २.० पोर्टलवर नोंदणी करावी लागते, मात्र त्यासाठी अपडेटेड आधार ओळखपत्र आवश्यक आहे.

केंद्र सरकारच्या कोविन २.० पोर्टलवर नोंदणी केल्यानंतर कोरोनाची लस मिळते. नोंदणीवेळी लाभार्थीची जन्मतारीख घेतली जाते. लाभार्थी व्यक्ती ४५ वर्षांपुढील वयाची असल्याची नोंद होते. आधार ओळखपत्रावर पूर्ण जन्मतारीख नसल्यास लसीसाठी नोंद होऊ शकत नाही. सध्या अनेकांना ही अडचण भेडसावू लागली आहे. काही वर्षांपूर्वी आधार ओळखपत्रे काढण्याची मोहिम सुरु झाली, तेव्हा पहिल्या टप्प्यात अनेकांनी फक्त जन्मवर्ष सांगून आधार ओळखपत्र घेतले. आजही अनेकांच्या ओळखपत्रावर जन्माचा दिवस व महिना यांची नोंद नाही. कोरोनाच्या लसीकरण पोर्टलवर अशी ओळखपत्रे नाकारली जात आहेत, त्यामुळे लस हवी असल्यास ओळखपत्र अपडेट करुन घ्यावे लागेल.

सध्या जिल्हाभरात आधार प्रमाणिकरण केंद्रे सुरु आहेत. जन्माविषयी कोणताही अधिकृत दस्तऐवज दाखविल्यास ५०-१०० रुपयांत जन्मतारखेची पूर्ण नोंद करुन दिली जाते. आठवडा-पंधरा दिवसांत पूर्ण जन्मतारखेसह नवे आधार ओळखपत्र मिळते, त्यामुळे लस घेऊ इच्छिणाऱ्यांनी ओळखपत्र अपडेट करुन घेण्याचे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.

चौकट

हे देखील चालेल

आधार ओळखपत्रात पूर्ण जन्मतारीख नसल्यास पॅन कार्ड, पासपोर्ट किंवा कोणतेही शासकीय सचित्र ओळखपत्र ग्राह्य धरले जात आहे. त्यावर पूर्ण जन्मतारीख अपेक्षित आहे.