Sangli ZP Election: जि. प. पंचायत समित्यांसाठी पहिल्या दिवशी एकही अर्ज नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2026 19:01 IST2026-01-17T19:00:39+5:302026-01-17T19:01:24+5:30

सांगली : जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या पहिल्या दिवशी, शुक्रवारी एकही अर्ज दाखल झाला ...

No applications for Sangli ZP Panchayat Samiti on the first day | Sangli ZP Election: जि. प. पंचायत समित्यांसाठी पहिल्या दिवशी एकही अर्ज नाही

Sangli ZP Election: जि. प. पंचायत समित्यांसाठी पहिल्या दिवशी एकही अर्ज नाही

सांगली : जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या पहिल्या दिवशी, शुक्रवारी एकही अर्ज दाखल झाला नाही. मात्र, मोठ्या संख्येने अर्ज इच्छुकांनी नेले. आटपाडीत जिल्हा परिषदेसाठी ३४, तर पंचायत समितीसाठी १९ अर्ज नेले. 

कडेगावमध्ये पंचायत समितीसाठी ८, तर जिल्हा परिषदेसाठी चौघांनी अर्ज नेले. कवठेमहांकाळला तब्बल १०४ इच्छुकांनी अर्ज नेले. वाळवा तालुक्यात ७५ जणांनी अर्ज नेले. जिल्हा परिषदेसाठी ३१ जणांनी, तर पंचायत समितीसाठी ४४ अर्ज नेण्यात आले. 

जतमध्ये पंचायत समिती व जिल्हा परिषदेसाठी प्रत्येकी ३९ याप्रमाणे ७८ अर्ज इच्छुकांनी नेले. दाखल मात्र एकही झाला नाही. शिराळ्यात २६ इच्छुकांनी अर्ज नेले. तासगावमध्ये जिल्हा परिषदेसाठी ३५ व्यक्तींनी ५० अर्ज नेले. पंचायत समितीसाठी ३१, जिल्हा परिषदेसाठी ५० अर्ज नेले.

Web Title : सांगली जिला परिषद चुनाव: पहले दिन कोई आवेदन नहीं।

Web Summary : सांगली जिला परिषद और पंचायत समिति चुनावों के लिए कई उम्मीदवारों ने फॉर्म लिए, लेकिन शुक्रवार को कोई आवेदन दाखिल नहीं किया गया। आटपाडी, कवठेमहांकाल और वालवा में अधिक रुचि दिखाई गई।

Web Title : Sangli ZP Election: No applications filed on first day.

Web Summary : Despite many aspirants collecting forms for Sangli Zilla Parishad and Panchayat Samiti elections, zero applications were filed on Friday. High interest shown in Atpadi, Kavathemahankal, and Walwa.