शहरं
Join us  
Trending Stories
1
ड्रीम-11ने भारतीय संघाची स्पॉन्सरशिप सोडली! आशिया कपपूर्वीच BCCI ला मोठा धक्का; किती पैसा मिळायचा?
2
म्हणे, परमेश्वराचे बोलावणे आले, आम्ही ८ सप्टेंबरला देहत्याग करणार, अनंतपुरात २० भाविकांच्या निर्णयाने प्रशासनात खळबळ
3
Dream 11 आता सुरू करणार 'हा' नवा बिझनेस; ऑनलाइन मनी गेमिंग बॅननंतर नव्या क्षेत्रात एन्ट्री घेण्याची तयारी
4
१७ चौकार, पाच षटकार.. १४२ धावांचा धमाका; ऑस्ट्रेलियन 'हेड'मास्तरांनी घेतली आफ्रिकेची शाळा
5
शेअर बाजाराची जबरदस्त सुरुवात; मोठ्या तेजीसह उघडले 'या' कंपन्यांचे शेअर्स
6
भटक्या कुत्र्यांचे प्रकरण: SC आदेशानंतर केंद्राचे राज्यांना निर्देश; ७० टक्के श्वानांचे लसीकरण अनिवार्य
7
'चांगली डील मिळेल तिथूनच तेल खरेदी करू'; अमेरिकेच्या टॅरिफवर भारताची रोखठोक भूमिका
8
जनावरासारखी कोंबली होती माणसं; भाविकांच्या ट्रॉलीला कंटेनरची धडक, ८ मृत्यूमुखी, ४३ गंभीर जखमी
9
Wife सोबत एकत्र Post Office च्या 'या' स्कीममध्ये करा गुंतवणूक, महिन्याला मिळेल ₹९२५० चं फिक्स व्याज
10
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना सकारात्मक, विविध लाभ; ६ राशींना संमिश्र; पैसे उसने देऊ नये!
11
आजचे राशीभविष्य, २५ ऑगस्ट २०२५: आजचा दिवस लाभदायी, वाद-विवाद टाळा, वाणीवर संयम ठेवा !
12
'निवडणूक आयोग-भाजपचे साटेलोटे; मतांची चोरी करू देणार नाही', राहुल गांधींनी ठणकावले
13
साहेब ! पाचवीतील विद्यार्थ्याचा पास संपला म्हणून त्यास भर पावसात बसमधून खाली उतरणार का?
14
विशेष लेख: जरा संभलके, बडे धोखे है इस राह में...
15
भारताने रशियाच्या तेलाबद्दल ट्रम्प यांचे मत गांभीर्याने घ्यावे, निक्की हेली यांचं विधान
16
झारखंडचे माजी मुख्यमंत्री चंपई सोरेन नजरकैदेत, नेमके प्रकरण काय? 
17
मंदिरांत राजकीय उपक्रम नकोत; खातरजमा करा, केरळमधील देवस्वोम मंडळांना कोर्टाचे निर्देश
18
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
19
अधिक काम करतो, पण मोबदलाही द्या; वाढत्या कामामुळे होतोय जगण्यावर नकारात्मक परिणाम
20
दिल्ली पोलिसांचे वॉरंट्स आता व्हॉट्सॲपद्वारे, पोलिस ठाण्यातून व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे साक्ष 

अंत्री बुद्रुक येथे पशुखाद्यातून विषबाधा झाल्याने नऊ संकरित गाईंचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2025 23:31 IST

माजी राज्यमंत्री शिवाजीराव नाईक, विराज नाईक यांची घटनास्थळी भेट.

- विकास शहा, शिराळा अंत्री बुद्रुक (ता. शिराळा) येथे पशु खाद्यातून विषबाधा झाल्याने दत्तात्रय उर्फ भावड्या उत्तम मोरे यांच्या पाच ते सहा वर्ष वयाच्या नऊ संकरित गाईंचा मृत्यू झाला आहे. अवघ्या पंधरा मिनिटात होत्याचे नव्हते झाले. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. आठ संकरित गाईंना गाभण असल्याने पशु खाद्य न घातल्याने त्याचा जीव वाचला आहे. या गाईंच्या मृत्यूमुळे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

दत्तात्रय मोरे यांनी आज सकाळी नऊ वाजेच्या दरम्यान नऊ गाईंना पशुखाद्य खाण्यासाठी टाकले. आठ गाईंना पशुखाद्य द्यायचे नसल्याने टाकले नाही. पशुखाद्य खाल्यावर अवघ्या दहा मिनिटातच या गाईंचे पोट फुगू लागले व एक एक करत नऊ गाई खाली कोसळल्या. 

यावेळी तातडीने पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना बोलविले. त्यांनी तपासणी केली त्याचा काहीही उपयोग झाला नाही. काही मिनिटात या सर्व नऊ गाईंचा मृत्यू झाला.

या सर्व गाई ३० ते ३५लिटर दूध देत होत्या. त्यांचा मृत्यू नक्की कशामुळे झाला, यासाठी पशुखाद्य नमुने तसेच गाईंचे शवविच्छेदन करून त्याचे काही नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. यामधे काही घातपात आहे का याचाही तपास पोलीस करीत आहेत.

यावेळी माजी राज्यमंत्री शिवाजीराव नाईक व विराज नाईक यांनी समक्ष भेट दिली. तहसीलदार शामला खोत पाटील, गटविकास अधिकारी प्रकाश पोळ, पशुसंवर्धन अधिकारी डॉ.सतीश कुमार जाधव, डॉ.सुनील पाटील, रवींद्र मटकरी,डॉ. एस एन खोत, डॉ. कैलास पोकळे,डॉ. दीपक पाटील यांनी तात्काळ भेट दिली. 

शिवाजीराव नाईक म्हणाले, पशुखाद्य ज्या कंपनीचे आहे त्यांनी  शेतकरी अडचणीतून बाहेर येणे साठी योग्य तपास करून याची शहा निशा होणे गरजेचे आहे. शेतकऱ्याला योग्य न्याय मिळावा या पद्धतीने पंचनामे करणे साठी सूचना दिल्या. सदरची घडलेली घटना ही अतिशय वाईट आहे.

या गाईंचा मृत्यू विषबाधेमुळे झाला आहे. सर्व नऊ गाईंचे शवविच्छेदन करण्यात आले आहे. या गाईंचे काही अवयव तसेच याचबरोबर गाईंनी खाल्लेले गवत, पशुखाद्य पुढील तपासणीसाठी पोलिसांमार्फत पुणे येथे पाठवण्यात आले आहेत. -डॉ.सतीश जाधव, पशुसंवर्धन अधिकारी, शिराळा 

दत्तात्रय मोरे अंत्री बुद्रुक यांच्या ९ गायी विष बाधा होऊन दगावल्या या या घटनेची माहिती मिळाल्या नंतर आमदार सत्यजित देशमुख यांनी मोरे कुटुंबायांची दूरध्वनीवरून विचारपूस केली. जिल्हा पशु वैद्यकीय अधिकारी, गटविकास अधिकारी,  तहसीलदार, पोलीस निरीक्षक  यांना घटने ची चौकशी करण्याचे आदेश दिले.

टॅग्स :cowगायDeathमृत्यूAnimalप्राणीPoliceपोलिस