शहरं
Join us  
Trending Stories
1
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
2
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
3
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
4
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
5
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
6
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
7
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
8
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
9
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
10
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
11
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
12
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
13
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
14
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
15
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
16
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
17
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
18
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
19
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
20
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड

नवजात अर्भकाचे अपहरण प्रकरण: मातेचे अश्रू पुसण्यासाठी धावले खाकी वर्दीतले देवदूत

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2022 12:38 IST

पोलिसांमधली माणुसकी, मायेचा ओलावा याबाबत वारंवार शंकांचे वादळ उठविणाऱ्या समाजातून आता याच खाकी वर्दीतल्या माणुसकीला सलाम ठोकला जात आहे.

दत्ता पाटीलतासगाव : पोलिसांमधली माणुसकी, मायेचा ओलावा याबाबत वारंवार शंकांचे वादळ उठविणाऱ्या समाजातून आता याच खाकी वर्दीतल्या माणुसकीला सलाम ठोकला जात आहे. आईच्या पोटातून जन्म घेऊन एक दिवसही न झालेल्या बाळाचे अपहरण झाले आणि तासगाव पोलिसांमधील माणुसकीचे दर्शन लोकांना घडले. तहान-भूक हरपून बाळाच्या शोधासाठी पोलिसांनी जिवाचे रान केले अन् दिवस ढळायच्या आत बाळाला आईच्या पदरात दिले. एका आईसाठी देवदूत बनलेल्या पाेलिसांवर म्हणूनच संपूर्ण जिल्ह्यातून कौतुकाचा वर्षाव केला जात आहे.तत्परता, गांभीर्य, माणुसकी हे शब्द पोलिसांना गैरलागू असल्याच्या तक्रारी वारंवार होत असतात. पोलिसांचे हृदय कठोर असते, असेही म्हटले जाते, पण तासगाव पोलिसांनी हे सर्व गैरसमज दूर केले. तासगावच्या खासगी रुग्णालयातून एक दिवसाच्या नवजात बाळाचे अपहरण झाल्याने बाळाची आई हादरली. तिच्या काळजात धस्स झालं. नातेवाईक, रुग्णालय प्रशासनही हादरले.सोशल मीडियावरून वाऱ्यासारखी ही घटना सर्वदूर पसरल्यानंतर जिल्हाच नव्हे, तर राज्यभर हळहळ व्यक्त झाली. ‘त्या’ बाळाचे अन् आईचे होणार काय, असा प्रश्न सामान्यांना सतावू लागला. घटनेने हादरलेल्यांच्या गर्दीत एकच दिलासादायी हात नातेवाईकांच्या खांद्यावर पडत होता, तो पोलिसांचा होता. चिंतेच्या अंधारात हरवलेल्या मातेलाही पोलिसांनी सांगितले की, बाळ लवकरच तुमच्या हाती असेल. पोलिसांच्या माध्यमातून प्रकाशाचा एकच किरण त्या आईला दिसला.अपहरणकर्त्या महिलेचा कोणताच ठावठिकाणा नव्हता. तिने दिलेला मोबाईल नंबरही चुकीचा आढळला. सीसीटीव्ही फुटेज हाच काय तो एकमेव तपासाला आधार होता. तरीही पोलीस हताश झाले नाहीत. त्या मातेला तिचे बाळ परत करायचे, हे एकच ध्येय बाळगून पोलिसांनी पायाला भिंगरी लावली. ना पोटात अन्न घेतले, ना शरीराला विश्रांती दिली. स्वत:च्या कुटुंबालाही कधी वेळ न देणाऱ्या पोलिसांनी एका बाळाला वाचविण्यासाठी ताकद व कौशल्य पणाला लावले. दिवस उजडायच्या आत त्यांनी या बाळाला सुखरूप आईकडे सोपविले. अपहरणकर्त्या महिलेलाही जेरबंद केले.

टॅग्स :SangliसांगलीKidnappingअपहरणPoliceपोलिस