शहरं
Join us  
Trending Stories
1
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
2
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
3
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
4
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार : संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
5
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
6
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
7
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
8
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
9
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
10
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
11
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
12
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
13
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
14
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
15
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
16
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
17
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
18
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
19
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
20
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादीचा विरोध : निधीचा परस्पर विनियोग केल्याचा आरोप

By admin | Updated: September 1, 2015 22:15 IST

सदस्यांनी सूचना देऊन काही योजनांना जादा निधी मिळू शकला असता. पण सत्ताधाऱ्यांतील दोन-चार नगरसेवक ठरवितात, त्यानुसार कामे होत आहेत, अशी टीकाही केली

सांगली : राज्य शासनाने चौदाव्या वित्त आयोगातून महापालिकेला दिलेल्या १४ कोटी ४६ लाख रुपयांच्या निधीची सत्ताधारी गटाने परस्परच विल्हेवाट लावली आहे. गेल्या महिन्यातील महासभेत महापौर विवेक कांबळे यांनी ऐनवेळी निधी खर्चाचा ठराव घुसडल्याचा आरोप राष्ट्रवादीचेनगरसेवक विष्णू माने यांनी मंगळवारी पत्रकारांशी बोलताना केला. पुढील महासभेत इतिवृत्त मंजुरीला विरोध करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. माने म्हणाले की, महापालिकेची आर्थिक स्थिती बिकट आहे. अशा स्थितीत शासकीय निधीचे वाटप करताना सदस्यांना विश्वासात घेण्याची गरज होती. पण महापौरांनी ऐनवेळी कोणताही विषय नसल्याचे सांगून सदस्यांची दिशाभूल केली आहे. गत महासभेत ऐनवेळी १४ व्या वित्त आयोगातून प्राप्त १४ कोटीचा निधी विविध विभागाकडे वर्ग करण्यात आला आहे. या ठरावावर महासभेत कोणतीही चर्चा झालेली नाही. या विषयाचे विषयपत्र १४ आॅगस्ट रोजीच महापौरांना प्राप्त झाले होते. महासभेत या विषयावर चर्चा होऊ शकली असती. पण पारदर्शी कारभाराच्या गप्पा मारणाऱ्या महापौरांनी ऐनवेळी ठराव घुसडून, त्यांच्या कारभाराची प्रचिती दिली आहे. सत्ताधाऱ्यांकडून बेकायदेशीररित्या निधी खर्च केला जात आहे. पाणीपुरवठा विभागाला केवळ एक कोटी रुपये दिले आहेत. वस्तुत: पाणी योजनेच्या कामाला तीन कोटीचा निधी अपेक्षित होता. माळबंगल्यावरील ७० एमएलडी जलशुद्धीकरण केंद्राचे काम अपूर्ण आहे. शहरातील नागरिकांना अपुरा पाणीपुरवठा होत आहे. अशा स्थितीत चर्चा झाली असती, तर सदस्यांनी सूचना देऊन काही योजनांना जादा निधी मिळू शकला असता. पण सत्ताधाऱ्यांतील दोन-चार नगरसेवक ठरवितात, त्यानुसार कामे होत आहेत, अशी टीकाही केली. (प्रतिनिधी)निधीचा विनियोग...घनकचरा व्यवस्थापन : ६.५१ कोटीवैयक्तिक शौचालय मनपा हिस्सा : १.५९ कोटीनागरी वनीकरण : ७२.३५ लाखनगरोत्थान योजना मनपा हिस्सा : १ कोटीपायाभूत सुविधा : ६३ लाखपाणी योजना : १ कोटीघरकुल योजना : ३ कोटी