शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
2
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
3
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
4
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
5
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
6
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
7
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
8
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
9
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
10
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
11
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
12
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
13
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
14
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
15
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
16
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
17
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
18
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
19
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
20
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळाविरोधात राष्ट्रवादीचा एल्गार

By admin | Updated: November 24, 2015 00:24 IST

राष्ट्रवादीची बैठक : बाजार समिती सभापती अविनाश पाटील यांची माहिती

तासगाव : तालुक्यातील पाणी योजना सुरु कराव्यात, दुष्काळाच्या सवलतीही मिळाव्यात, यासह अन्य मागण्यांबाबत शासनाला जाग आणण्यासाठी राष्ट्रवादीने आंदोलनाचा एल्गार पुकारला आहे. त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने आमदार सुमनताई पाटील यांच्या नेतृत्वाखाली २६ नोव्हेंबरला मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चासाठी हजारोंच्या संख्येने शेतकरी आणि कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन बाजार समितीचे सभापती अविनाश पाटील यांनी केले. तासगाव बाजार समितीत झालेल्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी तालुकाध्यक्ष हणमंत देसाई, युवराज पाटील प्रमुख उपस्थित होते.तासगाव - कवठेमहांकाळ तालुक्यातील पाणी पातळी खालावली आहे. चारा, पाणीटंचाई निर्माण झाली आहे. तालुक्यातील विसापूर-पणुदी, आरफळ, म्हैसाळ, ताकारी या पाणी योजना बंद अवस्थेत आहेत. टंचाईतून वीज बिल भरुन या योजना त्वरित सुरु कराव्यात, तरच पाणीप्रश्न सुटू शकणार आहे. विसापूर-पुणदी योजनेसाठी आर. आर. पाटील यांनी प्रयत्न केले. मात्र पाणीप्रश्नाकडे सध्याच्या शासनाचे दुर्लक्ष झाले आहे. तालुक्यात दुष्काळ जाहीर करावा, दुष्काळाच्या सवलती दोन्ही तालुक्यात त्वरित द्या, चारा छावण्या सुरु करा, वीज बिल, कर माफ करा, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क माफ करावे, पिकांची नुकसान भरपाई द्यावी, सौरऊर्जेवरील पाणी पंप अनुदानावर मिळावेत, तालुक्यातील अवैध धंदे बंद करावेत, यांसह अन्य मागण्यांसाठी मोर्चा काढण्यात येणार आहे. यासाठी तालुक्यातील शेतकऱ्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहनही यावेळी पाटील यांनी केले. (वार्ताहर)तालुक्यात एकापाठोपाठ एक अशा पध्दतीने शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत. या शेतकऱ्यांना मदत देण्यासाठीही टाळाटाळ होत आहे. सत्ताधाऱ्यांकडून त्यांची साधी विचारपूस देखील होत नाही. तालुक्यात होणाऱ्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या हा चिंंतेचा विषय आहे. हे थांबविण्यासाठी आणि सरकारला जाग आणण्यासाठीच हा मोर्चा काढण्यात येणार आहे. - अविनाश पाटील, सभापती, तासगाव कृषी उत्पन्न बाजार समिती, तासगाव.