शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

सांगली जिल्हा परिषदेत पाठिंब्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचा ‘बी’ प्लॅन तयार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2026 18:16 IST

‘पालकमंत्री काहीही म्हणतो, व्हीप आमचाच’

सांगली : जिल्हा परिषदेतील पाठिंब्याबाबत पहिल्या टप्प्यात मतभेदांचे दर्शन घडविणाऱ्या राष्ट्रवादी (अजित पवार)मध्ये आता एकमत होत असताना दिसत आहे. शनिवारी पक्षनेत्यांच्या मिरजेत झालेल्या बैठकीत पाठिंब्याविषयी एकमत झाले. भाजपला पाठिंबा न देता महाविकास आघाडीशी सूत जमविण्याचा सूर बहुतांश नेत्यांनी यावेळी व्यक्त केला.मिरजेत शासकीय विश्रामगृहात राष्ट्रवादी (अजित पवार)च्या नेत्यांची बैठक झाली. यावेळी माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख, अजितराव घोरपडे, जिल्हाध्यक्ष निशिकांत भोसले-पाटील, शिवाजीराव नाईक, माजी खासदार संजय पाटील, आदी उपस्थित होते.पाठिंब्याबाबत भाजप दुसऱ्या पसंतीचा पक्ष असल्याचे संकेत नेत्यांनी दिले. अर्थात, पक्षाने पाठिंब्याविषयी `बी` प्लॅनदेखील तयार केला आहे. मुंबईतील वरिष्ठांकडून भाजपलाच पाठिंब्याचे आदेश आले, तर दोन सदस्य आदेश झुगारून लावतील. व्हीपचे पालन केले नाही म्हणून ते अपात्र ठरतील.त्यामुळे यदाकदाचित या दोन सदस्यांच्या अपात्रतेमुळे पुन्हा निवडणुका लागल्या, तर त्यांना निवडून आणण्याची जबाबदारी जयंत पाटील, संजय पाटील व अजितराव घोरपडे हे वरिष्ठ नेते घेतील. याकामी तासगावचे आमदार रोहित पाटील यांनीही ताकद देण्याची जबाबदारी घेतल्याचे सांगण्यात आले. हे दोन सदस्य तासगाव, कवठेमहांकाळ, आटपाडी भागातील असतील.

जिल्हा परिषदेचा पॅटर्न पंचायत समितीतहीजिल्हा परिषदेत पक्षाकडून पाठिंब्याविषयी जो निर्णय होईल, तोच निर्णय पंचायत समित्यांनाही लागू असेल असे नेत्यांच्या बैठकीत ठरले. जिल्ह्यातील काही पंचायत समित्यांत सत्तास्थापनेसाठी राष्ट्रवादी(अजित पवार)च्या पाठिंब्याची गरज भासणार आहे. तेथेही सव्वावर्षे सभापतिपदाची अट ठेवली जाऊ शकते. काठावर बहुमत असलेल्या पंचायत समित्यांत यानिमित्ताने अजित पवार गटाला सत्तेची लॉटरी लागली आहे.... व्हीप आमचाच असेलपालकमंत्री व भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादी(अजित पवार) व्हीपचा इशारा दिला आहे. त्यावर पक्षाचे जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील यांनी बैठकीत ठाम भूमिका घेतल्याचे सांगण्यात आले. ‘पालकमंत्री काहीही म्हणाले तरी व्हीप आमच्याच पक्षाचा असेल’ असे त्यांनी स्पष्ट केले.

पाठिंब्याबाबत सर्वसामान्य कार्यकर्ते आणि जनमानसाच्या भूमिकेचा आम्हाला आदर केला पाहिजे. राजकारणात सातत्याने आम्हाला त्रास दिलेल्या तसेच ऐन निवडणुकीतही हैराण केलेल्या नेत्यांच्या पक्षाला पाठिंबा कसा द्यायचा ? असा नेत्यांचा आणि कार्यकर्त्यांचाही सूर आहे. कार्यकर्त्यांच्या मानसिकतेचा विचार करूनच पाठिंब्याविषयी पक्षामध्ये निर्णय घेण्यात आला आहे. त्याची माहिती मुंबईतील वरिष्ठांना एक-दोन दिवसांत देणार आहोत. त्यानंतर जिल्हास्तरावर निर्णय जाहीर केला जाईल. मात्र, सव्वा वर्षे अध्यक्षपदाची आमची अपेक्षा कायम आहे. - अजितराव घोरपडे, माजी मंत्री, नेते राष्ट्रवादी (अजित पवार)

English
हिंदी सारांश
Web Title : NCP's 'B' Plan Ready for Support in Sangli Zilla Parishad

Web Summary : NCP (Ajit Pawar group) favors Maha Vikas Aghadi in Sangli Zilla Parishad. A 'B' plan addresses potential high command orders to support BJP. The party will support members facing disqualification for defying orders, ensuring continued influence in local politics.
टॅग्स :Zilla Parishad Electionजिल्हा परिषद निवडणूक निकाल २०२६SangliसांगलीNCPराष्ट्रवादी काँग्रेसAjit Pawarअजित पवारBJPभाजपा