शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर निकाल वेगळा लागला असता"; ठाकरे बंधू युतीवर देवेंद्र फडणवीसांनी मतांचं 'गणित' उलगडलं
2
साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून मुख्यमंत्र्यांची फोनाफोनी; कुणाशी आणि काय बोलले स्वतःच सांगितलं!
3
मुंबईचा महापौर हिंदू होईल आणि तो मराठीच असेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलं स्पष्ट
4
आदित्य-अमित ठाकरेंकडून जाहीरनामा प्रसिद्ध; ७०० फुटांपर्यंत घरपट्टी माफ, महिलांना १५०० रुपये स्वाभिमान निधी
5
R Ashwin: "यंदाचा टी-२० विश्वचषक कोणीही पाहणार नाही"; रविचंद्रन अश्विन असं का म्हणाला?
6
स्विगी, झोमॅटो सारख्या कंपन्यांच्या डिलिव्हरी बॉईजना सुरक्षा मिळणार! 'या' अटी पूर्ण कराव्या लागतील; नवीन नियम जारी
7
राहुल नार्वेकरांचा Video व्हायरल, "माझ्याशी पंगा घेताय.."; हरिभाऊ राठोड यांनीही केले गंभीर आरोप
8
ठाण्यात एकाच घरात दोन पक्ष! मुलगा शिंदेसेनेतून, आई राष्ट्रवादी (शरद पवार) कडून आमने-सामने
9
Shrejal Guleria : अभिमानास्पद! वडील सैन्यात सुभेदार, लेक बनली फ्लाइंग ऑफिसर; तिसरी पिढी देशसेवेसाठी सज्ज
10
Video: आरारारा... खतरनाक! जेसन होल्डरने टाकला अजब-गजब चेंडू, क्रिकेटविश्वात रंगलीये चर्चा
11
सूडाची भावना! खांबाला बांधलं, केसाला धरुन फरफटत नेलं; लव्हमॅरेज केल्यावर जावयाला मारहाण
12
पनवेलमध्ये 'मविआ'ला उमेदवारांनीच दिला झटका! ७ जणांची माघार, भाजपाचे किती उमेदवार बिनविरोध विजयी?
13
राष्ट्रवादीचा 'मास्टरस्ट्रोक'! डॉक्टर, इंजिनिअर्ससह उत्तर भारतीयांना संधी, मलिक म्हणाले...
14
महापौरांसह सर्व समित्यांचे अध्यक्ष मराठीच हवेत! 'महानगरपालिकेसाठी मराठीनामा' कुणी केला जारी?
15
कधी काळी सचिन तेंडुलकरची झोप उडवणारा गोलंदाज; आज क्रूझ शिपवर गाणी गाऊन उदरनिर्वाह
16
कल्याण-डोंबिवलीत महायुतीने मतदानाआधीच अर्धी लढाई जिंकली, तब्बल १९ उमेदवार बिनविरोध
17
Jalgaon Municipal Election 2026: भाजपा-शिंदेसेनेचा विजयाचा 'षटकार'! युतीचे १२ उमेदवार बिनविरोध, वाचा संपूर्ण यादी
18
'हिंसक निदर्शनांमध्ये अमेरिका इराणमध्ये घुसण्यास तयार'; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला थेट इशारा
19
Viral Video: "बिहारमध्ये २०-२५ हजारांत मुली मिळतात", कॅबिनेट मंत्र्यांच्या पतीचं वादग्रस्त वक्तव्य
20
Uma Bharti : "लाजिरवाणं, अत्यंत कलंकित; आयुष्याची किंमत २ लाख..."; उमा भारतींचा भाजपाला घरचा आहेर
Daily Top 2Weekly Top 5

Sangli Municipal Election 2026: भाजपविरोधात राष्ट्रवादी-शिंदेसेनेने कंबर कसली

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2026 13:42 IST

शिंदेसेनेच्या उमेदवारांचा फायदा काँग्रेसच्या पॅनेलला होईल का? याचीही गणिते मांडली जात आहेत

सांगली : महापालिकेच्या निवडणुकीत दररोज नवनव्या आघाड्या- युती समोर येऊ लागली आहे. सांगलीत भाजपला रोखण्यासाठी दोन्ही राष्ट्रवादी, काँग्रेस व शिंदेसेनेकडून हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यासाठी काही प्रभागातून शिंदेसेनेच्या उमेदवारांचा अर्ज माघारी घेण्यावरही गुरुवारी दिवसभर चर्चा सुरू होती. तसेच शिंदेसेनेच्या उमेदवारांचा फायदा काँग्रेसच्या पॅनेलला होईल का? याचीही गणिते मांडली जात आहेत. त्यामुळे भाजपला राज्यातील सत्तेत एकत्र असलेल्या राष्ट्रवादी (अजित पवार) व शिंदेसेनेसह महाआघाडीशीही दोन हात करावे लागणार आहेत.महापालिका निवडणुकीत भाजपने जनसुराज्य शक्ती व रिपाइंला सोबत घेत ७८ जागांवर उमेदवार दिले. युती तुटल्यानंतर शिंदेसेनेनेही ६५ उमेदवार रिंगणात उतरविले आहेत. यात भाजपमधील माजी नगरसेवक युवराज बावडेकर, वैशाली बनसोडे, शीतल सदलगे, सुजित काटे, प्रा. रवींद्र ढगे यांच्यासह अनेकांना उमेदवारी दिली.

वाचा : माघार घ्या, भविष्यात चांगली संधी देऊ; बंडखोरांना नेत्यांचे आश्वासन दुसरीकडे राष्ट्रवादी (अजित पवार) व महाआघाडीत छुपा समझोता होऊन त्यांनी बहुतांश प्रभागात एकमेकांतील लढत टाळली आहे. भाजपशी थेट लढत देण्याची रणनीती महाआघाडी व राष्ट्रवादी (अजित पवार)ची आहे; पण शिंदेसेनेचे उमेदवार रिंगणात उतरल्याने भाजपविरोधातील मोट बांधण्याचा डाव फसण्याची चिन्हे दिसत होती.

यंदा निवडणुकीत भाजप विरोधी सारे एकवटलेगुरुवारी दिवसभरात राष्ट्रवादी (अजित पवार) आणि महाआघाडीतील नेत्यांनी शिंदेसेनेच्या प्रमुखांशी चर्चा सुरू केली होती. भाजपविरोधात एकच पॅनेल उभे करण्यावर चर्चा झाली. त्यानुसार काही प्रभागातून शिंदेसेनेचे उमेदवार अर्ज मागे घेण्याची शक्यता वर्तविली जात आहे. तसेच महाआघाडीने उमेदवार दिलेल्या प्रभागातही शिंदेसेनेचे पॅनेल आहे. पण, या पॅनेलचा महाआघाडीला कसा फायदा होईल व भाजपला शह बसेल, यावरही चर्चा करण्यात आल्याचे एका पदाधिकाऱ्याने खासगीत सांगितले. त्यामुळे यंदाच्या महापालिका निवडणुकीत भाजपविरोधात सारे असे चित्र दिसत आहे. त्यावर आज, शुक्रवारी अर्ज माघारीनंतरच शिक्कामोर्तब होणार आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Sangli Election: NCP, Shinde Sena Unite Against BJP; Alliances Forming

Web Summary : Sangli's municipal election sees NCP, Congress, and Shinde Sena strategizing against BJP. Alliances are forming, with potential candidate withdrawals to consolidate anti-BJP votes. Discussions focus on maximizing gains for the Maha Vikas Aghadi.
टॅग्स :Sangli Miraj Kupwad Municipal Corporation Electionसांगली मिरज कुपवड महानगरपालिका निवडणूक २०२६SangliसांगलीMunicipal Electionमहानगरपालिका निवडणूक २०२६BJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेसAjit Pawarअजित पवारShiv SenaशिवसेनाEknath Shindeएकनाथ शिंदे