शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
3
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
4
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
5
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
6
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
7
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
8
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
9
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
10
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
11
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
12
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
13
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
14
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
15
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
16
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
17
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
18
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
19
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
20
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

Sangli ZP: व्हीप पाळला नाही तर राष्ट्रवादीचे सदस्य अपात्र ठरतील, चंद्रकांत पाटील यांचा गर्भित इशारा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2026 14:30 IST

मुख्यमंत्री हे चांगले लोहचुंबक, जिल्हा परिषदेत सव्वा वर्षांचे चार अध्यक्ष

सांगली : महायुती म्हणून एकत्र येण्याचं ठरलं आहे. राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाचे सदस्य पक्षाच्या घड्याळ चिन्हावर निवडून आले आहेत. त्यांना पक्षाचा व्हिप मानावाच लागेल. अन्यथा ते अपात्र ठरतील, असा गर्भित इशारा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिला. जिल्हा परिषदेत महायुतीचाच अध्यक्ष होईल आणि सव्वा वर्षांचा एक याप्रमाणे चार अध्यक्ष होतील, असा दावाही त्यांनी केला.ते सोमवारी सांगलीत पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, माजी खासदार संजय पाटील यांनी पाठिंब्याबाबत एकमत असल्याचे म्हटले आहे. त्यांचे सदस्य पक्षाच्या चिन्हावर निवडून आले आहेत. त्यांनी पक्षाच्या व्हिपचे उल्लंघन केल्यास अपात्रतेची कारवाई होईल. अपात्रतेचा कायदा कठोर आहे. त्यावर निर्णयासाठी कोणत्याही न्यायालयात जावे लागत नाही. निवडणूक प्रमुख जागेवरच अपात्रतेचा निर्णय देऊ शकतो. सभागृहात व्हिपनुसार हात वर केला नाही, तर तो सदस्य जागेवरच अपात्र ठरतो. त्यामुळे विरोधात जाण्याचे धाडस कोणीही करणार नाही.ते म्हणाले, भाजप, शिंदेसेना किंवा राष्ट्रवादी (अजित पवार) यांच्यात एकत्र येण्याविषयी काही अडचण असेल, असे वाटत नाही. जिल्हा परिषदेतील बलाबल निश्चित झाले आहे. महायुतीचे संख्याबळ ३१ आहे. विकास आघाडीचे ३० होते. त्यामुळे महायुतीचाच अध्यक्ष होईल. युतीमध्ये पहिला अध्यक्ष कोणाचा होईल हे आपसात बोलून ठरविण्याचे काम सुरू आहे. सव्वा वर्षांचे चार जिल्हाध्यक्ष करू. त्यामध्ये कोणाला आज मिळेल, तर कोणाला उद्या मिळेल. पहिला संधी कोणाला? यात एकवाक्यता व्हावी लागेल. उपाध्यक्ष कोण, सभापतीपदे कोणाला? ही पुढील प्रक्रिया सोपी आहे. आमचे १८ सदस्य असल्याने पहिल्या वर्षी आमचाच अध्यक्ष असेल. राष्ट्रवादी काँग्रेसचे म्हणणे आहे की, अजित पवार यांच्या निधनाच्या पार्श्वभूमीवर पहिले वर्षे आम्हाला अध्यक्षपद मिळावे. अतिशय चांगले यश मिळविलेल्या आमदार सुहास बाबर यांनीही पहिल्या वर्षी अध्यक्षपद मागितले आहे. आमच्यात कोणतीही नाराजी नाही. अध्यक्षपदाविषयी एकत्र बसून मार्ग काढू.

मुख्यमंत्री हे चांगले लोहचुंबकचंद्रकांत पाटील म्हणाले, मुख्यमंत्री हा एक असा लोहचुंबक आहे की, तेथे गेल्यावर सारे त्यांचे म्हणणे मान्य करतात. तेदेखील योग्य मार्गदर्शन करतात. दोन गोष्टी तुम्ही मागे, तर दोन गोष्टी आम्ही पुढे असा मार्ग काढतात. मतभेद नाहीत असे नाही, ते आहेत; पण त्यातून मार्ग काढू.

English
हिंदी सारांश
Web Title : Sangli ZP: NCP members face disqualification for defying whip, warns Patil.

Web Summary : Chandrakant Patil warns NCP members in Sangli ZP of disqualification if they defy the party whip. He asserts Mahayuti will secure the president post, rotating it every year. Discussions are ongoing to decide the first president.
टॅग्स :Zilla Parishad Electionजिल्हा परिषद निवडणूक निकाल २०२६SangliसांगलीMahayutiमहायुतीNCPराष्ट्रवादी काँग्रेसAjit Pawarअजित पवारchandrakant patilचंद्रकांत पाटील