शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

Sangli: राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या पदाधिकाऱ्याची कार मणेराजुरीत पेटविली

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2024 15:49 IST

मणेराजूरी : मणेराजुरी (ता. तासगाव) राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांची चारचाकी कार पेटविण्यात आली. घराचे आतील छतही पेटविण्याचा प्रयत्न झाला आहे. या ...

मणेराजूरी : मणेराजुरी (ता. तासगाव) राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांची चारचाकी कार पेटविण्यात आली. घराचे आतील छतही पेटविण्याचा प्रयत्न झाला आहे. या प्रकाराने तासगाव तालुक्यासह परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. हा प्रकार पूर्ववैमन्यासूतन झाला की राजकीय वादातून याचा तपास तासगाव पोलिस करीत आहेत. या आकस्मिक घटनेची तासगाव पोलिसात तक्रार दाखल झाली आहे.राष्ट्रवादीचे (शरदचंद्र पवार) गटाचे युवा नेते व तासगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान संचालक रामचंद्र पवार यांचे राजमाने वस्ती रस्त्यावर घर आहे. पवार यांच्या नवीन घराचे बांधकाम सुरू आहे. त्यामुळे त्या बांधकामाशेजारीच शेडमध्ये रविवारी दुपारी लावलेली चारचाकी कार(एमएच१०/बीक्यू ३७७७) वर अज्ञातांनी रविवारी रात्री साडेबाराच्या दरम्यान पेटविली. ज्वालाग्राही स्प्रे मारून चारचाकी पेटविल्याचे प्रथमदर्शनी दिसत होते. याच ठिकाणी नवीन घराचे बांधकामाचे आतील सिलिंगही पेटल्याचे दिसत आहे. यामध्ये गाडीचे मोठे नुकसान झाले आहे. या घटनेची अज्ञातांविरोधात तासगाव पोलिस ठाण्यामध्ये रामचंद्र पवार यांनी तक्रार केली आहे. या घटनेला राजकीय संबंध आहे का ? का अन्य कोणता ? याबाबत पोलिस तपास करीत आहेत.

टॅग्स :SangliसांगलीNCPराष्ट्रवादी काँग्रेसSharad Pawarशरद पवारCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस