शहरं
Join us  
Trending Stories
1
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
2
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
3
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
4
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
5
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
6
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
7
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
8
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
9
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
10
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
11
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
12
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
13
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
14
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
15
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
16
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
17
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
18
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
19
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
20
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'

सांगली: भिलवडीनंतर 'या' गावात ग्रामपंचायीकडून दररोज होतेय राष्ट्रगीत गायन, महाराष्ट्रातील पहिलेच गाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2022 13:00 IST

देशप्रेमाचा हा अनोखा पायंडा सगळीकडे कौतुकाचा विषय झाला आहे.

विनोद पाटीलशिगाव : शिगाव (ता. वाळवा) येथे ग्रामस्थांच्या दैनंदिन कामकाजाची सुरुवात जनगणमन या राष्ट्रगीताने होते. देशभक्ती जोपासण्याचा वसा तसेच गावातील शहीद जवान रोमित तानाजी चव्हाण यांनी देशासाठी दिलेल्या बलिदानाचा आदर म्हणून ग्रामपंचायतीने स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित दि. १५ ऑगस्टपासून हा उपक्रम सुरू आहे. गेले दोन महिने हा उपक्रम नियमित सुरू आहे.सकाळचे ११ वाजले की, सायरन वाजतो. त्यानंतर पब्लिक ऑडिओ सिस्टीममधून राष्ट्रगीत वाजते. लोक असतील त्या जागीच उभे राहतात आणि राष्ट्रगीतानंतर ‘भारत माता की जय!’ असा जयघोष करून आपापले काम सुरू करतात. देशप्रेमाचा हा अनोखा पायंडा सगळीकडे कौतुकाचा विषय झाला आहे.नवख्या व्यक्तीसाठी हे आश्चर्यचकीत होण्यासारखेच. मात्र, इथल्या ग्रामस्थांसाठी हा एक आपल्या देशाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा व आपल्या रोमितला आदरांजली देण्याचा प्रयोग आहे. सात ते आठ हजार लोकसंख्या असलेल्या छोट्या गावातील नागरिकांमध्ये देशभक्तिचा उत्साह जागृत करण्याचे काम सरपंच, उपसरपंच, सदस्य, ग्रामसेवक, ग्रामपंचायत प्रशासनाकडून होत आहे.

जिल्ह्यातील भिलवडीमध्ये गेल्या दोन वर्षांपासून व्यापारी संघटनेकडून नित्यनियमाने सकाळी नऊ वाजून दहा मिनिटांनी राष्ट्रगीत गायले जाते. पण ग्रामपंचायत प्रशासनाने ग्रामसभेत या उपक्रमाचा रीतसर ठराव मंजूर करून राष्ट्रगीत गायले जाणारे शिगाव हे कदाचित महाराष्ट्रातील पहिलेच गाव असेल. शिगावमध्ये हा अभिनव उपक्रम कायमस्वरूपी सुरू ठेवण्याचा प्रयत्न आम्ही सदैव करणार आहोत. - उत्तम गावडे, सरपंच, शिगाव

टॅग्स :Sangliसांगली