सांगलीत खुनी हल्ला, एक गंभीर; चौघांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2024 11:44 IST2024-01-10T11:43:30+5:302024-01-10T11:44:07+5:30
सांगली : संजयनगर परिसरात पूर्वीच्या वादातून चौघांनी मिळून एका तरुणाचा चाकूने भोसकून खूनाचा प्रयत्न केला. सोमवारी रात्री साडेदहा वाजण्याच्या ...

सांगलीत खुनी हल्ला, एक गंभीर; चौघांना अटक
सांगली : संजयनगर परिसरात पूर्वीच्या वादातून चौघांनी मिळून एका तरुणाचा चाकूने भोसकून खूनाचा प्रयत्न केला. सोमवारी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.
अशोक ईश्वर म्हारुगडे (रा. संजयनगर) असे हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी चौघा संशयितांना ताब्यात घेतले आहे. राहुल सुखदेव खोत (वय २८), राहुल दिनकर पवार, रितेश सुरेश कांबळे आणि साहिल फारुख जामदार (२७, सर्व रा. संजयनगर) अशी संशयितांची नावे आहेत.
जखमी अशोक म्हारुगडे हा आपल्या कुटुंबीयांसह संजयनगरमधील पाचोरे प्लॉट येथे राहतो. संशयितांसोबत त्याचा काही दिवसांपूर्वी वाद झाला होता. काल रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास तो संजयनगरमधील श्रीनिती स्टेशनरीजवळ थांबला होता. तेव्हा संशयित राहुल खोत तिघा मित्रांसोबत आला. पूर्वी झालेल्या वादाच्या रागातून शिवीगाळ करत अशोकला दमदाटी केली. राहुलने चाकूने अशोकच्या पोटात भोसकले. हातावरही वार करून गंभीर जखमी करत खुनाचा प्रयत्न केला.
घटनेनंतर चौघांनी पळ काढला. जखमी अशोक यास तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. अशोकचा भाऊ आनंद याने संजयनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.