सांगली जिल्ह्यातील येलूर येथे भरदिवसा युवकाचा खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2021 17:46 IST2021-12-06T17:45:26+5:302021-12-06T17:46:33+5:30
महिलेची छेड काढल्याच्या रागातून करण्यात आला खून.

सांगली जिल्ह्यातील येलूर येथे भरदिवसा युवकाचा खून
येलूर : येलूर (ता. वाळवा) येथे भरदिवसा युवकाचा खून करण्यात आला. महिलेची छेड काढल्याच्या रागातून हा खून झाला. रणजीत रमेश पाटील (वय -३१) असे या खून झालेल्या युवकाचे नाव आहे. ही घटना आज, सोमवारी दुपारी दोन वाजता बाजारपेठेत घडली.
घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, रणजीत पाटील या युवकाने अमोल आनंदराव पाटील यांच्या पत्नीची छेड काढली. या रागातून अमोल आनंदराव पाटील व त्याचे वडील आनंदराव सावळा पाटील या दोघांनी रणजीतवर कोयत्याने वार केले. या हल्ल्यात रणजीत गंभीर जखमी झाला. त्याला इस्लामपूर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
याप्रकरणी कुरळप पोलिसांनी अमोल पाटील व आनंदराव पाटील यांना ताब्यात घेतले आहे. भरदिवसा खूनाची ही घटना घडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली.