कुपवाडमध्ये तरुणाचा अनैतिक संबंधातून खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2020 16:01 IST2020-05-19T15:59:37+5:302020-05-19T16:01:13+5:30
कुपवाड - मिरज रस्त्यालगत असलेल्या शिवशक्तीनगर मधील सचिन अण्णासाहेब सुतार ( वय ३०) या तरुणाचा तीन संशयितांनी धारदार शस्त्राने पाटीत,पोटावर सपासप ५८ वार करून खून करून संशयितांनी मोटारसायकलीवरून धूम ठोकली. कुपवाड पोलिसांनी एका संशयितास ताब्यात घेतले असून फरारीचा शोध घेण्यासाठी पोलिस पथके रवाना झाली आहेत.

कुपवाडमध्ये तरुणाचा अनैतिक संबंधातून खून
कुपवाड : कुपवाड - मिरज रस्त्यालगत असलेल्या शिवशक्तीनगर मधील सचिन अण्णासाहेब सुतार ( वय ३०) या तरुणाचा तीन संशयितांनी धारदार शस्त्राने पाटीत,पोटावर सपासप ५८ वार करून खून करून संशयितांनी मोटारसायकलीवरून धूम ठोकली. कुपवाड पोलिसांनी एका संशयितास ताब्यात घेतले असून फरारीचा शोध घेण्यासाठी पोलिस पथके रवाना झाली आहेत.
घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी मंगळवारी सकाळी सव्वाआठ वाजण्याच्या सुमारास सचिन सुतार हा आपल्या मोटारसायकलीवरून (एम. एच.०९ ई.डी. ७४२४)मेव्हुणा व अन्य एक असे तिघेजण शिवशक्तीनगरमधून जात होता.
तो घरापासून काही अंतरावर गेल्यावर समोरून मोटारसायकली वरुन आलेल्या तीन संशयितांनी त्याच्या मोटारसायकलला धडक दिल्याने सुतार रस्त्यावर पडला. तीन संशयितापैकी एकाने मेव्हुण्याला धरले तर अन्य दोघांनी धारदार शस्त्राने सुतार वर हल्ला केला.
सुतारच्या पाटीवर,पोटावर सपासप ५८ वार केले यावेळी मेव्हुण्याने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला.या झटापटीत त्याच्या पायाला किरकोळ मार लागला.तर तिसरा साथीदार पळून गेला.सुतार रक्ताच्या थारोळ्यात पडल्यानंतर संशयितांनी हत्यारासह मोटारसायकलीवरून धूम ठोकली.
मेव्हुण्याने सदरची घटना नातेवाईकांना दिली.नातेवाईकांनी मयत अवस्थेत सुतार ला सांगलीतील सिव्हील हॉस्पिटलमध्ये दाखल केले.दाखल करण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.पोलिसांनी तातडीने एका संशयितास ताब्यात घेतले असून दोघांच्या शोधासाठी पोलिस पथके रवाना झाली आहेत.