सांगलीत पूर्ववैमनस्यातून एकाचा धारदार शस्त्राने खून, एका संशयितासह अल्पवयीन मुलास घेतलं ताब्यात
By संतोष भिसे | Updated: January 9, 2024 16:04 IST2024-01-09T16:03:27+5:302024-01-09T16:04:59+5:30
सांगली : सांगलीत इंदिरानगर झोपडपट्टीमध्ये एकाचा धारदार शस्त्राने वार करून खून करण्यात आला. सोमवारी रात्री साडेनऊच्या सुमारास ही घटना ...

सांगलीत पूर्ववैमनस्यातून एकाचा धारदार शस्त्राने खून, एका संशयितासह अल्पवयीन मुलास घेतलं ताब्यात
सांगली : सांगलीत इंदिरानगर झोपडपट्टीमध्ये एकाचा धारदार शस्त्राने वार करून खून करण्यात आला. सोमवारी रात्री साडेनऊच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी पोलिस रेकॉर्डवरील एका संशयितासह अल्पवयीन मुलास विश्रामबाग पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
रवी रोहिदास काळे (वय ४५) असे मृताचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी रेकॉर्डवरील गुन्हेगार रोहित सकट यासह एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे. रवी आणि संशयित सकट यांच्यात पूर्वीपासून वाद होता. सोमवारी रात्री इंदिरानगर येथे त्यांच्यात पुन्हा टोकाचा वाद झाला.
त्यावेळी रोहितने धारदार शस्त्राने रवीवर वार केले. त्यात तो गंभीर जखमी झाला होता. हल्ल्यानंतर संशयित पळून गेले. रवी याच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरु होते. यादरम्यान मंगळवारी सकाळी त्याचा मृत्यू झाला. हल्ल्याची माहिती मिळताच विश्रामबाग पोलिसांनी तातडीने धाव घेतली. वेगाने हालचाली करत संशयितांना जेरबंद करण्यात यश मिळविले.