Crime News Sangli: वाटेगावात युवकाचा खून, नेमकं कारण अस्पष्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2022 14:29 IST2022-05-31T14:27:46+5:302022-05-31T14:29:01+5:30
सांगली जिल्ह्यात गुन्हेगारीच्या घटनामध्ये वाढ होतानाचे दिसत आहे.

Crime News Sangli: वाटेगावात युवकाचा खून, नेमकं कारण अस्पष्ट
कासेगाव/वाटेगाव : सांगली जिल्ह्यात गुन्हेगारीच्या घटनामध्ये वाढ होतानाचे दिसत आहे. दोन दिवसापुर्वीच शहरातील शंभरफुटी रोडवर खाद्यपदार्थ विक्रेत्याचा तीन जणांकडून धारदार हत्याराने भोसकून खून करण्यात आल्याची घटना घडली होती. यानंतर आज वाळवा तालुक्यातील वाटेगावात युवकाचा खून झाल्याची घटना समोर आली आहे. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
वाटेगाव (ता वाळवा ) येथील भुयाचा घोळ परिसरातील ओढ्यात (ओढा पात्रात) काल, सोमवारी रात्री युवकाचा खून करण्यात आला. प्रवीण प्रकाश साळुंखे उर्फ भावड्या (वय-३२ वाटेगाव वाडी विभाग) असे मृताचे नाव आहे. हा खून नेमका कोणत्या कारणावरुन झाला ह्याचे कारण अस्पष्ट आहे. पोलिसांनी तपास सुरु केला आहे.