शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

महापालिका-माधवनगरमध्ये सांडपाण्यावरून संघर्ष सुरू

By admin | Updated: January 29, 2015 00:13 IST

सांडपाणी लोकवस्तीत : रस्त्यावरून वाहू लागली गटार

सांगली : माधवनगर गावातून वाहत येणारे सांडपाणी सध्या कर्नाळ रस्ता ओलांडून महापालिकेच्या हद्दीतील लोकवस्तीत शिरले आहे. गेल्या आठवड्यापासून ही परिस्थिती असल्याने परिसरात व माधवनगर रेल्वे स्टेशन परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरली आहे. माधवनगर ग्रामपंचायतीला नोटीस बजावून महापालिका नामानिराळी झाल्याने नागरिकांचे हाल सुरू आहेत. कर्नाळ रस्त्यावरील माधवनगर रेल्वे स्टेशनपासून अवघ्या काही अंतरावर असलेल्या मंगेशीनगरसह अन्य नगरांमध्ये सांडपाणी शिरले आहे. येथील अनेक घरांना आता सांडपाण्याचा वेढा पडला आहे. माधवनगर जकात नाक्याकडून कर्नाळ, पद्माळेकडे जाणाऱ्या रस्त्यालगत माधवनगर हद्दीत मोठी गटार आहे. या गटारीतील सांडपाणी पूर्वी एका शेतकऱ्याच्या शेतात जात होते. काही दिवसांपूर्वी या शेतकऱ्याने हे सांडपाणी सोडण्यास विरोध केला. त्यानंतर हे सांडपाणी रस्ता ओलांडून पालिका हद्दीतील शिवोदयनगर तसेच मंगेशीनगर भागात सोडण्यात आले आहे. मोठ्या प्रमाणात सांडपाणी आल्याने संपूर्ण परिसरात दुर्गंधी पसरली आहे. त्यात या गटारीवर कत्तलखाने असल्याने नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. ग्रामपंचायतीने सांडपाण्याची विल्हेवाट लावावी, अन्यथा कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशाराही महापालिकेच्यावतीने देण्यात आला होता. पालिकेने ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक व पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांना याप्रकरणी ८ जानेवारीस नोटिसा बजाविल्या होत्या. तरीही ग्रामपंचायतीने याची कोणतीही दखल घेतली नाही. (प्रतिनिधी)उशिरा येते जाग -एखाद्या रोगाची साथ येण्यापूर्वी महापालिकेकडून कोणत्याही उपाययोजना होताना दिसत नाहीत. गॅस्ट्रोची साथ येण्यापूर्वी महापालिकेला नगरसेवकांनीच पत्र देऊन सतर्क केले होते. आरोग्य विभागाला मात्र साथ पसरल्यानंतर जाग आली. माधवनगर येथील सांडपाण्याबाबतही अशीच स्थिती आहे. याठिकाणी साथ आल्यावर किंवा एखाद्याचा जीव गेल्यावर महापालिकेला जाग येणार का?, असा संतप्त सवाल येथील नागरिकांतून उपस्थित केला जात आहे.