शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीत मनपा शाळेत शिक्षिकेकडून ४४ विद्यार्थ्यांना छडीची शिक्षा, संतप्त पालकांकडून अधिकाऱ्यांना घेराव

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2024 18:30 IST

संजयनगर : पंचशीलनगर येथील महापालिका शाळा क्रमांक २९ मध्ये शिक्षिकेने ४ विद्यार्थ्यांना गुरुवारी छडीने शिक्षा दिली. काही विद्यार्थ्यांनी मारहाणीची ...

संजयनगर : पंचशीलनगर येथील महापालिका शाळा क्रमांक २९ मध्ये शिक्षिकेने ४ विद्यार्थ्यांना गुरुवारी छडीने शिक्षा दिली. काही विद्यार्थ्यांनी मारहाणीची तक्रार पालकांनी सांगितल्यानंतर त्यांनी शुक्रवारी शाळेत येऊन संताप व्यक्त केला. शिक्षण मंडळाचे प्रशासकीय अधिकारी रंगराव आठवले घटनास्थळी आल्यानंतर त्यांना घेराव घातला. संजयनगर पोलिसही तत्काळ दाखल झाले.शाळा नंबर २९ मधील शिक्षक निवडणूक कामानिमित्त बैठकीस गेले होते. शिक्षिका विजया शिंगाडे यांच्याकडे पाच वर्ग सोपवले होते. यावेळी विद्यार्थी दंगा करत असल्याचे पाहून इयत्ता चौथी आणि सहावीच्या वर्गातील ४४ विद्यार्थी-विद्यार्थिनींना शिक्षिका शिंगाडे यांनी छडीने मारहाण केली. शाळेत मार खाल्लेल्या विद्यार्थ्यांनी सायंकाळी घरी पालकांना हा प्रकार सांगितला.शुक्रवारी संतप्त पालकांनी शाळेत गर्दी करत या प्रकरणाचा जाब विचारला. महापालिका प्रशासकीय अधिकारी रंगराव आठवले तत्काळ शाळेत आले. त्यांना संतप्त पालकांनी शाळेत कोंडून ठेवले. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून संजयनगर पोलिसांना कळवले. निरीक्षक बयाजीराव कुरळे घटनास्थळी दाखल झाले. महापालिकेच्या उपायुक्त शिल्पा दरेकर यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन शिक्षक, विद्यार्थी व पालकांशी संवाद साधला. या प्रकरणाची चौकशी करून कारवाई करण्याचे आश्वासन दिले. त्यामुळे प्रकरणावर पडदा पडला.

सक्तीच्या रजेवर पाठवाया प्रकरणाची सखोल चौकशी होऊन दोषी शिक्षकांना पाठीशी घालणाऱ्या प्रशासकीय अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी. चौकशी होईपर्यंत सक्तीच्या रजेवर पाठवावे, अशी मागणी पालकांसह शहर व नागरिक विकास मंचचे संघटक डॉ. कैलास पाटील यांनी केली.मुख्याध्यापकांना चक्कर, शिक्षकास वीजेचा धक्कासंतप्त पालकांनी जाब विचारल्यानंतर मुख्याध्यापक माळी यांना चक्कर आली. त्यांना उपचारासाठी दवाखान्यात नेण्यात आले, तसेच शिक्षक राऊत हे वाॅटर फिल्टर सुरू करण्यासाठी गेल्यानंतर त्यांना विजेचा धक्का लागला. त्यांना सिव्हीलमध्ये ‘आयसीयू’ मध्ये दाखल केले.

संबंधित शिक्षिकेकडून विद्यार्थ्यांना मारहाण झाल्याचे दिसून आले आहे. त्या शिक्षिकेवर लवकरात लवकर कारवाई करण्यात येईल. - शिल्पा दरेकर, उपायुक्त

टॅग्स :Sangliसांगलीzpजिल्हा परिषदSchoolशाळाStudentविद्यार्थी