शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामपंचायतींकडे महावितरणची १७२ कोटींची थकबाकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 04:27 IST

सांगली : जिल्ह्यातील ग्रामपंचायतींकडे सार्वजनिक पाणीपुरवठा व पथदिव्यांची १७२ कोटी ६० लाख रुपयांची थकबाकी आहे. यापैकी ग्रामपंचायतींनी चालूचे २६ ...

सांगली : जिल्ह्यातील ग्रामपंचायतींकडे सार्वजनिक पाणीपुरवठा व पथदिव्यांची १७२ कोटी ६० लाख रुपयांची थकबाकी आहे. यापैकी ग्रामपंचायतींनी चालूचे २६ कोटी ३० लक्ष रुपये आठ दिवसात भरावेत, अन्यथा वीज पुरवठा खंडित करण्यात येईल, असा इशारा महावितरणच्या अधिकाऱ्यांनी दिला आहे.

सद्यस्थितीत महावितरण आर्थिक संकटात असून थकबाकी वसुलीचे आव्हान उभे ठाकले आहे. महावितरणकडून थकबाकी वसुलीसाठी थकबाकीदार वीज ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्याची धडक मोहीम राबविली जाते आहे. जिल्ह्यातील ग्रामपंचायतींची सार्वजनिक पाणी पुरवठ्याची एक हजार २८७ आणि पथदिव्यांची दोन हजार ९३५ वीज कनेक्शन थकबाकीत आहेत. या पाणीपुरवठा आणि पथदिव्यांची १४६ कोटी ३० लाख रुपयांची जुनी थकबाकी आहे. तसेच चालूचे वीज बिल २६ कोटी ३० लाख रुपयांचे आहे. थकीत वीज बिलाबाबत शासनाकडून निर्णय होईपर्यंत ग्रामपंचायतींनी चालूचे २६ कोटी ३० लाख रुपयांचे वीज बिल भरावे, असे आवाहन महावितरणच्या अधिकाऱ्यांनी केले आहे. ग्रामपंचायतींनी सार्वजनिक पाणीपुरवठा व पथदिव्यांची चालू वीज देयके स्वनिधीतून भरण्याचे ग्रामविकास विभागाने आदेश दिले आहेत. त्या संदर्भातील दिरंगाईस संबंधित ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक व सरपंच यांना वैयक्तिकरित्या जबाबदार धरण्यात येईल, असे शासनाने म्हटले आहे. तरीही ग्रामपंचायतीकडून महावितरणची थकबाकी भरली जात नाही.

या थकबाकी संदर्भात महावितरणने ग्रामपंचायतींच्या सरपंच व ग्रामसेवकांना वेळोवेळी सूचना दिली आहे. मात्र ग्रामपंचायतीकडून अद्यापही चालू वीज देयके भरणेबाबत अपेक्षित प्रतिसाद मिळाला नसल्याने वीज पुरवठा खंडितची कटू कारवाई होऊ शकते. तरी ग्रामपंचायतींनी पाणीपुरवठा व पथदिव्यांचे चालू वीज देयकांचा त्वरित भरणा करावा, असे आवाहन महावितरणने केले आहे.